Chandrakant Patil | औरंगाबाद : इतिहास आणि त्याबद्दल नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी केलेल्या विधानानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटत असतानाच आता भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी एक खळबळजनक विधान केलं आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा उभारताना लोकांकडं भीक मागितली, असं विधान भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं. यामुळे नव्या वादाला सुरुवात झाली असून विविध स्तरातून त्यांच्या या वक्तव्याचा निषेध केला जात आहे.
ते म्हणाले, “त्या काळात सरकार शाळांसाठी अनुदान देत नव्हते. तरीसुद्धा महापुरुषांना शाळा उघडल्या केल्या. मात्र, आता लोकं शाळांच्या अनुदानासाठी सरकारवर अवलंबून राहतात. कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी शाळा सुरू केल्या. या शाळा सुरू करताना सरकारनं त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडं भीक मागितली.”
“ते म्हणायचे मला पैसे द्या. त्या काळात दहा रुपये देणारे होते. आता दहा कोटी रुपये देणारे आहेत. सीएसआरच्या माध्यमातून कंपन्यांच्या नफ्यातून दोन टक्के खर्च करण्यासाठी कायदा झाला आहे”, असं चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Vasant More | “स्मशानभूमीत येईन, पण मनसेच्या शहर कार्यालयात जाणार नाही”; वसंत मोरे असं का म्हणाले?
- Nilesh Rane | “अरे चम्या तुझं कोण कुत्र तरी ऐकतं का?”, निलेश राणेंचा आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल
- PAK vs ENG | इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात ‘हा’ पराक्रम करत रचला इतिहास
- Gajanan Kale | “शिल्लक सेनेतले सगळे मर्द संपले असतील तर…”; राऊतांचा उल्लेख करत मनसेचा ठाकरे गटावर हल्लाबोल
- Katrina Kaif & Vicky Koushal | विकी-कॅटच्या लग्नात का होते मर्यादित लोकं?, कतरिनाने दिले उत्तर म्हणाली…


