Share

Sanjay Raut | “शिवाजी महाराज यांचा अपमान जनतेने विसरायला हवा, म्हणून भाजपाने…”; संजय राऊतांचा आरोप काय?

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई : इतिहास आणि त्याबद्दल नेत्यांची वादग्रस्त वक्तव्यं यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापलेले आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, भाजप नेते मंगलप्रभात लोढा, रावसाहेब दानवे, प्रसाद लाड, सुधांशू त्रिवेदी यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काही विधाने समोर आली आह. याच वादग्रस्त विधानावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर आरोप केले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजप (BJP) नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांचा  मुद्दा तापलेला असताना याचा विसर पाडण्यासाठी  भाजपने महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा विषय समोर आणल्याचा आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे.

ते म्हणाले, “तुमच्या मनात शिवाजी महाराजांच्या विषयी प्रेम आणि काय भावना हे दिसून येत आहे.” भाजपचा डीएनए चेक करायला पाहिजे असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचा अवमान असल्याचे राऊत यांनी म्हंटले आहे

महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा मुद्दा बाहेर काढून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल झालेला अपमानाची तीव्र भावना कमी करण्यासाठीच भाजपने ही भूमिका घेतल्याचं संजय राऊत म्हंटले आहेत. महाराष्ट्राचे दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी कुणी काही बोलत असेल तर त्याविषयी आम्ही आक्रमक होणारच असेही संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!