🕒 1 min read
Nana Patole | मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल (Election Results )जसजसे स्पष्ट होत आहेत तसतशा राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. गुजरात निवडणुकांच्या निकालावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
लोकशाहीची हत्या करून मिळवलेला हा विजय असल्याचं नाना पटोले म्हणालेत. पुढे ते म्हणाले, “गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्जची आयात झाली. मुंद्रा पोर्टावर मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. तरुणांमध्ये व्यसनाधीनतेचं प्रमाण, भय, भ्रष्टाचार या सर्व गोष्टींचा गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर झाला.”
हिमाचल प्रदेशमध्ये कोणीही भाजपचे नेते गेले तरी काहीही फरक पडणार नाही, तिथे कोंग्रेसचीच सत्ता येईल असा दावाही नाना पटोले यांनी यावेळी बोलताना केलाय. भाजपने केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून मिळवलेली सत्ता आहे असा आरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.
“जो निकाल आला त्याचं आम्ही स्वागत करतो. लोकशाहीत मतदानाच्या वेळी भय, भ्रष्टाचार आणि व्यसनाधिनता हे अपेक्षित नाही. आम्हाला गुजरातमध्ये ज्या कमी जागा मिळाल्या त्याचं आम्ही आत्मपरिक्षण करू. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस गुजरातमध्ये चांगली कामगिरी करेल,” असं मत नाना पटोले यांनी व्यक्त केलं.
महत्वाच्या बातम्या :
- Gujarat Election Result | “राहुल गांधी देशाचे नेतृत्व होऊ शकत नाही” ; गुजरात निकालांवर बावनकुळेंची प्रतिक्रिया!
- Cyclone Mandous | ‘मंदोस’ चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीवर परिणाम, तर राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची शक्यता
- Himachal Pradesh Election Result | हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला ‘ऑपरेशन लोटस’ची भीती, घेतला ‘हा’ निर्णय
- Gujarat Election Result । रविंद्र जडेजाची पत्नी रिवाबा आघाडीवर; काय आहे स्टेटस?
- Gujarat Election Result | गुजरातमध्ये भाजपला मत विभागणीचा फायदा मिळाला – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
