Share

Maharashtra Karnataka Border Dispute | आम्ही बेळगाव दौरा पुढे ढकलला, रद्द केलेला नाही – शंभूराज देसाई

Published On: 

🕒 1 min read

Maharashtra Karnataka Border Dispute | मुंबई : महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद अधिकच गडद होत चालला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील दोन मंत्र्यांचा कर्नाटकातील बेळगावी दौरा पुढे ढकलावा लागला. हे मंत्री तेथे जाऊन ग्रामस्थांशी चर्चा करणार होते. त्यांच्या दौऱ्यामुळे तेथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कर्नाटक सरकारने म्हटले आहे. महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) आज बेळगाव जाणार होते.

महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, आमच्या दोन मंत्र्यांच्या बेळगावी भेटीबाबत आम्ही कर्नाटक सरकारला अधिकृतपणे कळवले आहे. देसाई म्हणाले की, आम्ही दौरा पुढे ढकलला आहे, रद्द केलेला नाही.

“आमच्या पूर्ण दौऱ्याला कर्नाटक सरकारने वेगळं वळण दिले. त्यांनी सांगितलं की तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि आम्ही तिथे जाऊ नये म्हणून त्यांच्या सरकारच्या मुख्यसचिवांनी महाराष्ट्र सरकारलाही अधिकृतरित्याही कळवलं होतं”, असे शंभूराज देसाई म्हणाले.

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा इशारा –

मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले, “महाराष्ट्राच्या मंत्र्याने राज्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा दौरा सध्याच्या परिस्थितीत योग्य नागही. त्यांच्या दौऱ्यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होईल. महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा दौरा म्हणजे चिथावणीखोर कृत्य आहे. शिवाय, हे लोकांच्या भावना भडकवण्यासारखे आहे.”

महाराष्ट्र राज्यासोबतचा सीमावाद हा कर्नाटकसाठी बंद झालेला अध्याय आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लोकांमध्ये एकोपा आहे. तसेच सीमेचा वाद आहे. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात देखील आहे, असे बोम्मई म्हणाले.

भाजप-शिवसेना युती सरकारमधील मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी 6 डिसेंबर रोजी बेळगावला भेट देणार असल्याचे जाहीर केले होते. या पार्श्वभूमीवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा इशारा दिला आहे.

काय आहे वाद-

बेळगावी आणि कारवारमधील काही गावांबाबत महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यात सीमा विवाद आहे. कर्नाटकात येणाऱ्या या गावांची लोकसंख्या मराठी भाषिक आहे. ही गावे राज्यात समाविष्ट करण्याची महाराष्ट्राची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. 1960 मध्ये महाराष्ट्राच्या स्थापनेपासून हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला-

महाराष्ट्र मंत्र्यांच्या बेळगाव दौऱ्यावरुन कन्नड रक्षण वेदिका संघटना आक्रमक झाली आहे. या संघटनेने मंत्र्यांना इशारा दिला होता. दरम्यान या संघटनेने महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला आहे. हिरबागेवाडी टोलनाक्यावर हा हल्ला झाला. या संघटनेचे नारायण गौडा हे आज बेळगाव दौऱ्यावर आहेत.

या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या चौकात रास्ता रोको केला. तसेच रस्त्यावरील वाहने अडवली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र सरकार विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली. गाड्यांच्या काचा देखील फोडण्यात आल्या.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!