Share

Udayanraje Bhosale | “पवार-गडकरींच्या जागी मी असतो तर…”; उदयनराजेंचा खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

Udayanraje Bhosale | पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना मराठवाडा विद्यापीठाकडून मानद डि. लिट पदवी देण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) हे कुलपती म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी आणि शरद पवार यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी (Chhatrapati Shivaji Maharaj) केली. राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध करत विविध स्तरातून यावर प्रतिक्रिया आल्या. यावर उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी प्रतिक्रिया देत शरद पवार आणि नितीन गडकरी याच्यावर टीका केली आहे.

“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि नितीन गडकरी यांना औरंगाबादच्या बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जी पदवी देण्यात आली, त्या ठिकाणी मी असतो तर मी ती पदवी घेतलीच नसती”, असं वक्तव्य उदयनराजे भोसले यांनी केलं आहे.

ते म्हणाले, “राज्यपाल यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. तरीही तिथं कुणी काही बोललं नाही. याच कार्यक्रमात त्यांच्या विधानाचा निषेध करायला पाहिजे होता. पण तसं झालं नाही. याचं वाईट वाटतं.” शिवरायांचा अपमान करणारी अशी विधानं करताना कोश्यारींना लाज वाटत नाही का?, असा सवाल त्यांनी केलाय.

“त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे की काय? जेव्हा मुघल साम्राज्यासमोर सगळे शरण जात होते, तेव्हा एकटे छत्रपती शिवाजी महाराज ताठ मानेने जनतेसाठी, देशासाठी उभे राहिले होते. त्यांना शरण जायचे असते तर तेव्हाच गेले असते. माफीनामा देण्याची गरज नव्हती. असे वक्तव्य करताना या लोकांना लाज वाटत नाही का? हे लोक कशाचा आधार घेऊन बोलत आहेत,” अशा शब्दांत उदयनराजे यांनी राज्यपालांचा समाचार घेतला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!