Share

Sharad Pawar | एकनाथ शिंदेंच्या ज्योतीष भेटीवर शरद पवार म्हणाले, “दौरा सोडून हात दाखवायला…”

Published On: 

🕒 1 min read

Sharad Pawar | मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) काल शिर्डी दौऱ्यावर गेले होते. यावेळी ते ज्योतिषाकडे देखील गेले. यावरुन राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्षातील नेते टीका करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावरुन मुख्यमंत्र्यांना टोला लगावला असून महाराष्ट्रात हे प्रकार नवीन असल्याचं म्हटलं आहे.

पवार म्हणाले, “मी काही ज्योतिषी नाही, त्यामुळे मी काही सांगू शकणार नाही. माझा त्यावर विश्वासही नाही, त्यामुळे मी दौरा सोडून हात दाखवायला कुठे जात नाही. आपण आता हल्ली नवीन गोष्टी पाहत आहोत. महाराष्ट्रात याआधी असं होत नव्हतं.”

“आसाममध्ये काय घडलं हे सर्व देशाला माहिती आहे. आता पुन्हा एकदा आसामची ट्रीप होणार असल्याचं मी वाचलं. त्याच्याशी सुसंगत कार्यक्रम बंद करुन शिर्डीला जाणं आणि नंतर सिन्नरला जाऊन कोणाला तरी हात दाखवणं या गोष्टी आमच्यासाठी नवीन आहेत. पुरोगामी विचारांचं राज्य असा लौकिक असलेल्या महाराष्ट्रात या नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. पण या गोष्टीचा स्वीकार करत नाही हे जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही,” अशा शब्दात शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं आहे.

दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या जोतीष भेटीवर अजित पवारांनी देखील टीका केली आहे. “ही आपली परंपरा आहे. त्याबद्दल आपल्या मनात आदराचं, श्रद्धेचं स्थान आहे. तिथंपर्यंत मी समजू शकतो. मात्र, ज्योतिषाकडे जाऊन आपलं भविष्य बघणं म्हणजे २१ व्या शतकात सर्व जग चाललं असताना आपण अंधश्रद्धांना खतपाणी घालण्यासारखं आहे”, असा टोला अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!