🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: जगभरातील मोबाईल (Mobile) उत्पादक कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन तंत्रज्ञानासह आपले नवीन मॉडेल्स बाजारात लाँच करत असते. यामुळे टेलिकम्युनिकेशन इंडस्ट्रीमध्ये दिवसेंदिवस स्पर्धा वाढत चालली आहे. त्यामुळे प्रत्येक टेलीकम्युनिकेशन कंपनी आपल्या प्रॉडक्ट्सवर अधिक बारकाईने काम करते. मोबाईल उत्पादक कंपनी Vivo सुद्धा आपल्या नवीन मॉडेलवर काम करत आहे. यामध्ये Vivo लवकरच Vivo X90 सिरीज लाँच करणार आहे. ही सिरीज चीनमध्ये लॉंच करणारी Vivo ही पहिली कंपनी आहे. अशा परिस्थितीत या नवीन Vivo स्मार्टफोनची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. कंपनीने या नवीन स्मार्टफोनचे नाव Vivo Y02 ठेवले आहेत. दरम्यान, कंपनीकडून अद्याप या फोनच्या लॉन्चिंग तारखेबद्दल कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
लीक झालेल्या माहितीनुसार, Vivo च्या या नवीन मोबाईल मध्ये 1600×720 पिक्सल रेज्युलेशनसह 6.51 इंचाचा Halo FullView IPS LED पॅनल असणार आहे. या Vivo स्मार्टफोनमध्ये किमान 2 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटरनल स्टोरेज उपलब्ध असू शकते. त्याचबरोबर यामध्ये 512 जीबी पर्यंत मायक्रो एसडी कार्ड सपोर्ट देखील मिळू शकतो. तर, दुसरीकडे कंपनी या फोनमध्ये MediaTek Helio P22 प्रोसेसर देऊ शकते.
Vivo च्या फोनच्या कॅमेरा बद्दल जर बोलायचे झाले, तर यामध्ये मागील बाजूस LED फ्लॅशसह 8 मेगापिक्सल सिंगल कॅमेरा असू शकतो. त्याचबरोबर सेल्फीसाठी या मोबाईल मध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील असू शकतो. या फोनमध्ये बॅटरी 5000mAh ची असू शकते, जी पर्यंत 10W चार्जिंगला सपोर्ट करू शकते. तर हा फोन Android 12 वर काम करेल.
कंपनीकडून अद्याप या फोनच्या किमती बद्दल कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. पण लीक झालेल्या रिपोर्टनुसार, या फोनची किंमत 8449 रुपयापर्यंत असू शकते.
महत्वाच्या बातम्या
- Virat Kohli | विराट कोहलीची इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल, नक्की काय आहे ‘त्या’ व्हिडिओमध्ये?
- Jitendra Awhad | मोठी बातमी! आव्हाडांवर गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल
- Ajit Pawar | “विनयभंगाचे कलम लावणे अतिशय भ्याड, सरकारने गुन्हा मागे घ्यावा” ; अजित पवार यांनी मागणी
- Chandrashekhar Bawankule | “जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करा”, चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांकडे मागणी
- Ajit Pawar | “आव्हाडप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी” ; अजित पवार आक्रमक!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
