🕒 1 min read
Gunratna Sadavarte | मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात उडी घेत त्यांना पाठींबा देण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नक्षलवाद्यांकडून धमकीचं पत्र मिळालंअसल्याचा दावा करत त्यात मराठा आरक्षण, ईडब्ल्यूएस आरक्षण याचा उल्लेख असल्याचं सदावर्तेंनी म्हंटल आहे.
ते म्हणाले, नक्षली संघटनेच्या जनता अदालतमध्ये २२ फेब्रुवारी २०२२ ला झालेल्या बैठकीत माझी हत्या करण्याचा निर्णय झाला होता. पत्राच्या आधारे पोलीस तक्रार दिली आहे. हा विषय एटीएस आणि नक्षल सेल आणि गृहमंत्रालयाच्या संबंधित आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस नक्षली संघटनांना वर तोंड काढू देणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
सदावर्ते म्हणाले, “कम्युनिस्ट पक्ष भारत मुंबई विभाग यांच्याकडून नक्षली संघटनेचा संदर्भ असलेलं पत्र कार्यालयात मिळालं आहे. ‘लाल सलाम’ असं लिहलेल्या पत्रात मराठा आरक्षण, ईडब्ल्यूएस आरक्षण (EWS reservation) आणि महाविकास आघाडी सरकारच्या काळात झालेल्या आंदोलनाचा उल्लेख आहे. आरएसएसबरोबर (RSS) माझा संबंध असल्याचेही पत्रात म्हटलं आहे.
दरम्यान, नक्षलावद्यांच्या पत्रात महाविकास आघाडी सरकारच्या काळातील तारखांचा संदर्भ येत असून, तो थोडा संशयित असल्याचं सदावर्ते म्हणाले. पुढे ते म्हणतात, कारण एप्रिल महिन्यात ‘सिल्वर ओक’ हल्ल्याप्रकरणी मला अटक करण्यात आली होती. त्यानंतर माझ्या निवासस्थानाची सुरक्षा कमी करण्यात आली, त्याच्या मागचं कारण विश्वास नांगरे पाटील सांगू शकतील देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर सुरक्षा विभागातून फोन आला होता. परंतु, नक्षली संघटनांचा प्रतिबंध करणे आवश्यक असल्याचं सदावर्ते यांनी सांगितलं.
महत्वाच्या बातम्या :
- Virat Kohli | विराट कोहलीची इंस्टाग्राम स्टोरी व्हायरल, नक्की काय आहे ‘त्या’ व्हिडिओमध्ये?
- Jitendra Awhad | मोठी बातमी! आव्हाडांवर गुन्हा दाखल करणाऱ्या महिलेवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल
- Ajit Pawar | “विनयभंगाचे कलम लावणे अतिशय भ्याड, सरकारने गुन्हा मागे घ्यावा” ; अजित पवार यांनी मागणी
- Chandrashekhar Bawankule | “जितेंद्र आव्हाड यांचं निलंबन करा”, चंद्रशेखर बावनकुळे यांची शरद पवारांकडे मागणी
- Ajit Pawar | “आव्हाडप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी” ; अजित पवार आक्रमक!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
