🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये सध्या इलेक्ट्रिक कार (Electric Car) चा ट्रेंड दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे प्रत्येक वाहन उत्पादक कंपनी आपल्या कंपनीचे सर्वोत्तम इलेक्ट्रिक व्हेरिएंट बाजारात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीत सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार कोण लवकर लाँच करेल यामध्ये देखील स्पर्धा सुरू आहे. याच परिस्थितीचा फायदा घेत मुंबईतील इलेक्ट्रिक वाहक उत्पादन कंपनी पीएमव्ही (PMV) लवकरच आपली इलेक्ट्रिक कार लाँच करणार आहे. कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार Micro EaS-E या महिन्यातील 16 तारखेला लाँच करणार आहे. तर दुसरीकडे कंपनीने या इलेक्ट्रिक कारचे बुकिंग देखील सुरू केले आहे. पीएमव्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून ग्राहक फक्त 2,000 रुपयांमध्ये या इलेक्ट्रिक कारची प्री बुकिंग करू शकतात. या इलेक्ट्रिक कारची किंमत 4 लाख रुपये असू शकते. सध्या देशांमध्ये टाटा मोटर्स Tiago EV सर्वात स्वस्त कार आहे पण पीएमव्ही कंपनीची ही कार या गाडीला टक्कर देऊ शकते.
PMV च्या या नवीन इलेक्ट्रिक कारमध्ये प्रगत तंत्रज्ञानासह उत्कृष्ट फीचर्स मिळणार आहेत. त्याचबरोबर यामध्ये ड्रायव्हिंग मोड आणि क्रूज कंट्रोल देखील उपलब्ध आहे. या टू सीटर कार मध्ये एक व्यक्ती समोर आणि एक व्यक्ती मागे बसू शकते. PMV चे संस्थापक कल्पित पटेल यांनी या मॉडेलचा प्रोटोटाईप तयार केला आहे. कंपनीतच 16 नोव्हेंबर रोजी सादर करणार आहे. या कारमध्ये चार दरवाजे आणि दोन सीट आहेत. या कारचा वापर आपण दैनंदिन कामासाठी करू शकतो. त्याचबरोबर या कार मध्ये एक व्यक्ती समोर आणि दुसरी व्यक्ती मागे बसू शकते.
देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार (Electric Car)
भारतामध्ये आतापर्यंत अनेक इलेक्ट्रिक कार्स लाँच झाले आहेत. त्यामध्ये टाटा मोटर्स Tiago EV ही सर्वात स्वस्त कार होती. ज्याची किंमत 8.49 लाख रुपयांपासून सुरू होते. दरम्यान, पीएमव्ही या कंपनीद्वारे लाँच करण्यात येणारी Micro EaS-E ही इलेक्ट्रिक कार देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार बनू शकते. कारण या कारची किंमत सुमारे 4 लाख रुपये असू शकते. कंपनी या कारची विक्री पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला करू शकते.
PMV कंपनीद्वारे लाँच करण्यात येणाऱ्या या इलेक्ट्रिक कार मध्ये 2 प्रकारचे बॅटरी बॅकअप उपलब्ध असू शकते. दरम्यान कंपनीकडून या कार्याबद्दल अजून कुठलीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. कंपनी 16 नोव्हेंबर रोजी म्हणजेच कार लॉन्चिंग च्या दिवशी फीचर्स बद्दल अधिक माहिती देईल.
महत्वाच्या बातम्या
- Kirit Somaiya | “जितेंद्र आव्हाड ‘त्या’ प्रकरणावर माफी कधी मागणार?”; किरीट सोमय्यांचा सवाल
- World Diabetes Day | ‘या’ गोष्टी केल्याने नियंत्रणात राहू शकते डायबिटीज
- Sushama Andhare | “प्रिय कब्बु… तर ते तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवतील..!”, सुषमा अंधारेंचं मुलीला भावुक पत्र
- Rohit Pawar | “सरकारचं अति होतंय!” ; जितेंद्र आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रोहित पवार संतापले
- Supriya Sule | जितेंद्र आव्हाडांची आमदारकीच्या राजीनाम्याची घोषणा; सुप्रिया सुळे म्हणाल्या, “त्या महिलेची…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
