🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: पीएम किसान सन्मान निधी (PM Kisan Yojana) योजनेचा बारावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोचला आहे. तर दुसरीकडे तेरावे हप्त्यासाठी शेतकऱ्यांची कसरत सुरू आहे. शेतकरी गुगल सर्च करून आणि बँकांना भेट देऊन योजनेची माहिती मिळवत आहे. त्याचबरोबर हप्ता अडकण्यामागे काय कारण असू शकते? हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे.
दरम्यान, बँकेत खाते नसले किंवा ई-केवायसी मध्ये किरकोळ अपडेट नसले तर शेतकऱ्यांना ही रक्कम मिळत नाही. दुसरीकडे शेतकरी जिल्हा कृषी विभाग आणि बँकेमध्ये या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी चकरा मारत आहे. पीएम पोर्टलवर ई केवायसी संदर्भात सर्व माहिती उपलब्ध असल्याचे कृषी विभागाचे अधिकारी माहिती देत आहे. त्यावरून शेतकरी केवायसी बद्दल माहिती घेऊ शकता.
यामुळे अडकले आहे शेतकऱ्यांच्या पीएम किसन योजनेचे (PM Kisan Yojana) पैसे
पी एम किसान योजनेचे पैसे अडकल्याची तक्रारी शेतकरी करत आहे. तर दुसरीकडे बँक खाते अपडेट करताना शेतकऱ्यांकडून सहसा चुका होत असतात त्यामुळे हे पैसे अडकल्याची माहिती समोर येत आहे. बँकेचे नाव, आधार क्रमांक, पॅन क्रमांक इत्यादी गोष्टी मध्ये त्रुटी असल्यामुळे शेतकऱ्यांना पैसे मिळण्यास व्यत्यय येत आहे. त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांनी अद्यापही ई -केवायसी नसल्यामुळे देखील त्यांना पैसे मिळण्यास अडचण येत आहे. त्याचबरोबर बँकेसंबंधित समस्या निर्माण होत असताना शेतकऱ्यांनी तात्काळ बँकेची संपर्क साधावा असे सल्ले कृषी विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना देत आहे.
पी एम किसान योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनाही ई-केवायसी करणे अनिवार्य केले होते. दर देशामध्ये 17000 शेतकऱ्यांची खाती ई-केवायसी आणि किरकोळ त्रुटी असल्यामुळे नाकारण्यात आली आहे. तेरावा हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी या त्रुटी भरून काढावा असे आवाहन कृषी विभागाचे कर्मचारी शेतकऱ्यांना करत आहे.
महत्वाच्या बातम्या
- Ajit Pawar | “दादा वाचून यांचं काय नडतं कुणाला माहिती” ; नाराजीच्या चर्चेनंतर अजित पवार पहिल्यांदा बोलले
- MS Dhoni | क्रिकेट मैदानानंतर महेंद्रसिंग धोनी दिसणार आता मोठ्या पडद्यावर
- Udayanraje bhosale | ‘जगदंबा’ तलवार भारतात आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न’; यावर उदयनराजे म्हणतात…
- Thackeray vs FadnAvis | तपास यंत्रणाच्या कारवायांवरुन ठाकरे-फडणवीस सामना रंगला! वार-पलटवार वाचा
- Sushma Andhare । “…ही फक्त तयारीची सुरुवात आहे”; राऊतांच्या सुटकेनंतर सुषमा अंधारेंचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
