Share

Aditya Thackeray | गुवाहाटीला गेलेल्या ‘या’ आमदाराला आदित्य ठाकरेंनी मारली मिठी अन् म्हणाले…, ठाकरेंच्या मिठीची जोरदार चर्चा

Published On: 

🕒 1 min read

Aditya Thackeray | अकोला : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी अकोला येथे शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी गुवाहाटीला जात असताना सुरतवरुन परत येणारे नेते नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांना आदित्य ठाकरे यांनी भर सभेत मिठी मारली. तसेच त्यांच्या मुलाला बोलावून त्याला प्रश्न देखील विचारले. या मिठीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

यादरम्यान, मंचावर भाषण करताना हेच ते आमदार आहेत, जे गुवाहटीला जाण्यासाठी शिंदे (CM Eknath Shinde) गटाबरोबर गेले. मात्र सूरतहूनच निघून आले. शिंदे गटाने गुवाहटीला जाण्यासाठी दबाव आणला, मात्र मी तिथून पळून आल्याचं नितीन देशमुख सांगतात, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

गद्दार विकले गेले, पण नितीन देशमुख विकले गेले नाहीत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. सभेत बोलताना नितीन देशमुख आणि अरविंद सावंत यांच्या हातात हात घेत, तो उंचावून दाखवत अभिवादन केलं. राज्यातील राजकीय वर्तुळात आज आदित्य ठाकरे यांची ही सभा चर्चेचा विषय ठरली आहे.

नितीन देशमुखांच्या मुलाला आदित्य ठाकरेंनी मंचावर बोलावून तुझे बाबा विकले गेले असते आणि 50 खोके मिळाले असते, ते खोके चांगले की आजचा दिवस चांगला? यावर नितीन देशमुख यांच्या मुलाने आजचा दिवस चांगला, असं उत्तर दिलं आहे. एकंदरितच आदित्य ठाकरेंची आणखीन एक सभा जोरदार ठरली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!