Share

Alia Bhatt | रणबीर-आलियाच्या घरी लवकरच येणार आहे छोटा पाहुणा

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: बॉलीवूड (Bollywood) सुपरस्टार आलिया भट (Alia Bhatt) आणि रणबीर कपूर (Ranbir Kapoor) लवकरच आई वडील होणार आहेत. नुकतेच आलियाच्या बेबी शॉवर पूर्ण झाले आहे. ज्याचे सुंदर फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तेव्हापासून आलियाच्या बाळाची सगळेजण आतुरतेने वाट बघत आहे. त्यांचे कुटुंब आणि चाहत्यांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. कारण आलियाच्या डिलिव्हरी संबंधित मोठी माहिती समोर आली आहे.

आलिया-रणबीरच्या घरी येणार लवकरच छोटा पाहुणा

आपल्या सगळ्यांना माहीतच आहे की, आलिया भट आणि रणबीर कपूर त्यांच्या छोट्या पाहुण्याच्या स्वागतासाठी तयार आहेत. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आलिया आई होऊ शकते. दरम्यान, समोर आलेल्या नवीन माहितीनुसार, आलिया भट तिच्या डिलिव्हरीसाठी एच एन रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आहे. याचा अर्थ असा की आलिया कधीही तिच्या बाळाला जन्म देऊ शकते. या बातमीने आलिया-रणबीरचे चाहते आश्चर्यचकित झाले आहेत.

हॉस्पिटलमध्ये नोंदविण्यात आले आलिया भट (Alia Bhatt) चे नाव

बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट आणि अभिनेता रणबीर कपूर यांनी यावर्षी एप्रिलमध्ये लग्न केलं. लग्नाच्या दोन महिन्यानंतर आलियाने आपली प्रेग्नेंसी जाहीर केली. ही बातमी तिने तिच्या सोशल पोस्टद्वारे तिच्या चाहत्यांसोबत शेअर केली होती. आत्ता आलेल्या बातमीनुसार, आलिया एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेली असून ती कधीही तिच्या बाळाला जन्म देऊ शकतो. तिचे  हॉस्पिटलमध्ये नावही नोंदवण्यात आले आहे. चाहत्यांच्या नजर आता फक्त आलिया आणि रणबीरच्या गोड बातमीवर आहे.

बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट हे दोघ त्यांच्या ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडल्याची माहिती समोर आलेली आहे. 2018 मध्ये या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान ते दोघे रिलेशनशिप मध्ये आले होते. लग्नाआधी हे दोघे तब्बल तीन वर्षे एकमेकांना डेट करत होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!