Share

Gulabrao Patil | गुलाबराव पाटलांची जीभ घसरली, सुषमा अंधारेंना म्हणाले – “ठाकरेंच्या चित्रपटातील नटी”

Published On: 

🕒 1 min read

Gulabrao Patil | मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील नेते गुलाबराव पाटील भागात जाऊन त्यांना खुलं आव्हान दिलं होतं. यानंतर गुलाबराव पाटील अंधारेंवर जोरदार टीका केली. मात्र, यावेळी टीका करत असताना गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांची जीभ घसरली असून सुषमा अंधारे (Sushama Andhare) यांचा उल्लेख त्यांनी नटी म्हणून केला आहे.

सुषमा अंधारे यांना मुंबई महापालिका निवडणुकीसाठी लाडू दिला आहे, म्हणून त्या फिरत आहे. मला माझा जिल्हा ओळखतो. त्यांनाही महाराष्ट्र ओळखतो. ठाकरेंना त्यांच्या पिक्चरमध्ये नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे, त्याप्रमाणे आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. त्यांचा कुठेही पिक्चर चालला नाही म्हणून त्यांना नटीची गरज होती. ज्याप्रमाणे पिक्चरमध्ये एखादी बाई पाहिजे असते, त्याप्रमाणे यांनी आता आमच्या पिक्चरमध्ये या बाईला आणलं. असा जोरदार घणाघात मंत्री गुलाबराव पाटील यांनी उध्दव ठाकरे तसेच अंधारे यांच्यावर केला. तसेच सुषमा अंधारेंना मुंबई महापालिकेसाठी लाडू दिलेला आहे म्हणून त्या फिरत असल्याची बोचरी टीका पाटलांनी केली आहे.

यादरम्यान, सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्या सभा रद्द केल्याच्या वादावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, “हा विषय माध्यमांनी तापवला. आम्ही तापवला नाही, एखाद्या राष्ट्रपतीप्रमाणे त्यांच्या सभा या सर्व माध्यमांनी लाईव्ह दाखवल्या. लोकमान्य लोकांना एवढं महत्त्व देत नाही तेवढं महत्त्व त्यांना दिले.”

पाहा व्हिडीओ –

सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांची सभा होऊ न देण्यासाठी मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दबाव टाकला, असा आरोप झाला होता. यावर पाटील म्हणाले, “आम्ही दबाव टाकला असता तर सुषमा अंधारे यांची धरणगावची सभा सुद्धा होऊ दिली नसती.

शिवसेनेत फूट पडण्यामागे मी स्वतः जबाबदार असल्याची कबूली आदित्य ठाकरे यांनी दिली असल्याचं गुलाबराव पाटलांनी स्पष्ट केलं आहे. यावर प्रतिक्रिया देत असताना मूळ चुका या त्यांच्याच होत्या. मात्र तरीही आम्हाला गद्दार म्हटले जाते. आम्ही गद्दार नव्हतोच. आम्हाला यांनी समजूनच घेतलं नाही. राज्यात आज फिरताहेत, आपण मुख्यमंत्र्यांचे पुत्र आहात, आणि बाळासाहेबांचे नातू आहात. त्यामुळे फिरल्यामुळे, काही ना काही नाराजी या दूर होतील. समस्या दूर होतील असे वाटले होते. पण गाढवांच्या पुढे वाचली गाथा आता रात्रीचा गोंधळ बराच होता असे म्हणत एखाद्या माणसाने सांगावं आणि इतरांनी ते ऐकूच नये, असं देखील गुलाबराव पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!