Share

MVA | “… तर महाराष्ट्रात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येणार”, घटनातज्ञांच भाकीत

Published On: 

🕒 1 min read

MVA | मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना (Shivsena) पक्षावर दावा केल्यानंतर काल या प्रकरणाची सुनावणी होती. त्यामुळे निकाल शिंदेंच्या बाजूने लागणार की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच सुनावणी रद्द झाली. तर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis Govt) आलं. मात्र, आता काही कारणांमुळे त्यांचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. अशातच घटनातज्ञ उल्हास बापट (Ulhas Bapat) यांनी मोठं विधान करत महाविकास आघाडी सरकार (MVA) पुन्हा सत्तेत येईल असं भाकीत केलं आहे.

राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचं सरकार येऊ शकतं असं मोठं विधान घटनातज्ञ उल्हास बापट यांनी केलं आहे. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र झाले तर या आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे, मुख्यमंत्रीच अपात्र झाले तर सरकार पडेल असा दावा उल्हास बापट यांनी केला आहे.

यादरम्यान, राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी महाविकास आघाडीला बोलावलं तर सरकार पुन्हा येऊ शकतं असा दावा देखील बापट यांनी केला आहे.

दरम्यान, शिवसेना कोणाची या प्रकरणाची सुनावणी २९ नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे २९ तारखेला निर्णय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूने होणार की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), हे पाहणं महत्वाचं राहिल

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!