🕒 1 min read
Eknath Shinde | पुणे : महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प राज्यातून बाहेर गेले. यातील तीन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर विरोधकांनी टीकेची तोफचं चालवली आहे. अशातच एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून पुणे (Pune) येथे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली आहे. या बॅनरवर ठाकरेंना प्रकल्प जाण्यासाठी जबाबदार ठरवण्यात आलं आहे.
‘उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा’ अशा आशयाचे बॅनर शिंदे गटामार्फत लावण्यात आले आहेत. या बॅनरवर महाराष्ट्रातून किती प्रकल्प कधी आणि कुठे गेले आहेत त्याच्या नावाची यादी प्रसिद्ध करून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे.
बॅनरवर प्रामुख्याने वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, टाटा एअरबस या प्रकल्पात महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका काय होती आणि हे प्रकल्प महाराष्ट्रातून कोणत्या इतर राज्यात आणि कोणत्या वर्षी गेले हे सविस्तरपणे लिहिण्यात आल आहे.
वेदांता फॉक्सकॉन या कंपनीची प्रस्तावित गुंतवणूक १.५४ लाख कोटी इतकी होती. तर यामधून दीड लाख रोजगार उपलब्ध होणार होते. हा प्रकल्प सप्टेंबर २०२० मध्येच गुजरातमध्ये गेला असल्याचा दावा या बॅनरमध्ये करण्यात आला आहे. तर या प्रकल्पाला विरोध करत हा प्रकल्प होणार नाही, अशी घोषणा तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जानेवारी २०२० मध्ये केल्याचंही या बॅनरमध्ये म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- NCP | महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांवर बोलताना राष्ट्रवादीच्या आमदाराने केलं ‘हे’ मोठे विधान
- Uddhav Thackeray | “मोदी आयोध्यातील श्रीरामाचे पूजन करतात अन् अनुयायी भलत्याच रामाच्या…”, उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा
- Sujay Vikhe Patil | महाराष्ट्राबाहेर जात असलेल्या प्रकल्पावर सुजय विखे पाटलांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- Sushma Andhare | “…तर अशा माणसाने मुख्यमंत्रीपदी कशाला बसावं?”; सुषमा अंधारेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
- Rana-Kadu | राणा-कडू वाद गोड झाला?, वर्षावर झालेल्या चर्चेनंतर दोन्ही नेत्यांची प्रतिक्रिया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
