🕒 1 min read
अमरावती : निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाने आपल्या पक्षाचं नाव आणि त्यासोबत तीन चिन्ह सादर केली होती. त्यानूसार सोमवारी रात्री आयोगाने निर्णय जाहीर केला, परंतू त्यामध्ये ठाकरे गटाला चिन्ह आणि नाव दिलं गेलं. शिंदे गटालाही नाव दिल, मात्र शिंदे गटाने सादर केलेले तीनही चिन्ह अमान्य करत आयोगाने कोणतही चिन्ह दिलं नाही. त्यामुळे शिंदे गटाला काल म्हणजेच मंगळवारी सकाळी तीन नवीन चिन्ह सादर करायची होती. सादर केलेल्या चिन्हांमधून निवडणूक आयोगाने काल रात्री शिंदे गटाचे चिन्ह जाहीर केले. शिंदे गटाला ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह दिलं आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे ?
गद्दारीची तलवार घेऊन तुम्ही आमच्या जवळ येण्याचा प्रयत्न जरी केला तरि ही मशाल तुम्हाला भस्मसात करेल, असं म्हणत अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर हल्ला केला आहे. दानवे अमरावती दौऱ्यावर असून, त्यावेळी भाषण करताना ते बोलत होते. गावागावात आपल्याला मशाली काढाव्या लागतील मशाल ही आता जनते समोर पोहचली पाहिजे, असंही दानवे यांनी म्हटलं आहे.
याशिवाय बरेच जण आम्हाला हिंदुत्व शिकवण्याची भाषा करतात, आमचं हिंदुत्व कागदावरच नाही. हिंदुत्वाची भाषा करता, मग सांगलीत साधूवर हल्ला झाला तेव्हा तुम्ही काय केलं ? तेव्हा हल्ला झाला तर हिंदू संकटात आला नाही का ?, असा सवालही दानवे यांनी केला आहे.
तसेच, आता कुठं गेली हनुमान चालीसा, कुठं गेला भोंगा ?. यापुढे जेव्हा निवडणुका होतील तेव्हा शिवसैनिक राणांना हनुमान चालीसा म्हणायला घरी बसवतील. नाव राणा ठेवायचं आणि काम रावणाच करायचे, असं म्हणत अंबादास दानवे यांनी राणा दाम्पत्यालाही लक्ष्य केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “आम्हाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळाले, कारण…”; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला
- Eknath Shinde | “सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी ढाल, दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू तलवार”
- Eknath Shinde। “आता तरी मान्य करा, खरी शिवसेना…”; एकनाथ शिंदे यांचा खोचक टोला
- Shivsena । शिंदे गट नवीन शिवसेना भवन उभारण्याच्या तयारीत; जागा आणि नाव दोन्ही ठरलं
- IND VS SA | सामनावीर ठरल्यानंतर कुलदीप यादवने केले मोठे वक्तव्य, म्हणाला…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
