Share

Eknath Shinde | “आम्हाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळाले, कारण…”; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : आता निवडणूक आयोगाकडून दोन्ही गटांना (उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट) पोट निवडणुकीसाठी नाव आणि चिन्ह देण्यात आलं आहे. ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असं नाव दिलं असून,’मशाल’ हे चिन्ह दिलं आहे.तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव आणि ‘ढाल-तलवार’ हे चिन्ह दिलं आहे. दोन्ही गटांना मिळालेल्या नाव आणि चिन्हांवरून अनेक राजकीय नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत एक वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

निवडणूक आयोगाने आम्हाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव दिले आहे. कारण आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहोत, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरे यांनाच टोला लगावला आहे. मुंबईमधील एका कार्यक्रमाच्या वेळी ते बोलत होते. आम्ही बाळासाहेबांच्या विचारांसाठी सत्तेला लाथ मारली. परत सत्ता मिळेल की नाही, याचा विचार आम्ही केला नाही.

गणपती नवरात्रीदरम्यान मी मंडळांना भेटी देत होतो. त्यावेळी राज्याला दोन मुख्यमंत्री हवे, अशी टीका विरोधकांकडून होत होती. मात्र, आधीच्या सरकारमध्ये दोन मुख्यमंत्री होते. आता मी एकटा पुरेसा आहे. आमची बांधिलकी जनतेशी आहे. कोणी कितीही टीका केली त्याला आम्ही कामाने उत्तर देऊ,असं शिंदे यांनी म्हटलं आहे. राज्याचा सर्वांगिण विकास करण्याचे आमचे धोरण आहे. पहिल्याच महिन्यात आम्ही 72 निर्णय घेतले. पेट्रोल डिझलचे भाव कमी केले, शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले. यापुढेही विकासाची कामे होतील. काही दिवसांपूर्वीच आम्ही नगरविकास मंत्रालयाचे साडेबारा हजार कोटी रुपयांचे प्रकल्प केंद्र सकारकडे पाठवले होते. मात्र, केंद्राने त्यातला एकही रुपया कमी केला नाही. सर्व प्रकल्प मान्य केले.

तसेच, आमची लढाई ही स्वार्थासाठी नाही, तर तत्वांसाठी आहे. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेकजण मला भेटले, त्यांनी सांगितलं की, तुम्ही मुख्यमंत्री व्हावे, म्हणून आम्ही प्रार्थना केली होती. आज आम्ही जनतेसाठी, विचारधारेसाठी मंत्रीपद सोडलं. आमची धाडसी लढाई बघितल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पाठिंबा दिला, असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!