Share

Eknath Shinde। “आता तरी मान्य करा, खरी शिवसेना…”; एकनाथ शिंदे यांचा खोचक टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार आता शिंदे गट बाळासाहेबांची शिवसेना तर उद्धव ठाकरे गट उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाने ओळखला जाणार आहे. उद्धव ठाकरे गटाला ‘मशाल’ हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. याच चिन्हावरून आता भाजपा आणि शिंदे गटातील नेते उद्धव ठाकरे समर्थकांना लक्ष्य करत आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेतील दोन्ही गटांना उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट आयोगासमोर आपल्या पक्षाचं नाव आणि त्यासोबत तीन चिन्ह सादर करायची होती. त्यानूसार दोन्ही पक्षांनी तीन-तीन चिन्ह आणि पक्षाचं नाव सादर करण्यात आली. त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग कोणत्या गटाला कोणतं चिन्ह देणार याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होत. काल ठाकरे गटाला तर आज शिंदे गटाला चिन्ह देण्यात आलं.

बाळासाहेबांची शिवसेना हे पक्षाचे नाव आणि ढाल-तलवार हे चिन्ह मिळाल्याने आम्हीच बाळासाहेबांचे खरे वारसदार असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे. आम्हीच हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचारांचे खरे वारसदार. सज्जनांच्या रक्षणासाठी बनूनी ढाल दुर्जनांच्या संहारासाठी हाती धरू ढाल, या शब्दात ट्विट करीत मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केली आहे.

निवडणूक चिन्हासाठी शिंदे गटाने निवडणूक आयोगाला दोन मेल पाठवण्यात आले होते. पहिल्या मेलमधून शंख, तुतारी आणि रिक्षा ही तीन चिन्हे शिंदे गटाने निवडणूक आयोगासमोर ठेवली आहेत. तर दुसऱ्या मेलमध्ये ढाल-तलवार, सूर्य, पिंपळाचं झाड हे तीन चिन्ह आयोगासमोर ठेवण्यात आले होते. त्यापैकी ढाल-तलवार हे चिन्ह शिंदे गटाला मिळालं आहे. आमची शिवसेना हीच बाळासाहेबांची खरी शिवसेना असून सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम बाळासाहेबांप्रमाणेच आम्ही करत राहू, अशी भावना मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!