Share

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात काळ्या पैश्यांचा पाऊस? हायकोर्टात मनी लाँड्रींगची याचिका दाखल; ईडी करणार का चौकशी?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : जून महिन्यात झालेल्या राजकीय नाटकानंतर राज्यत सत्तांतर झाली. शिवसेनेत महत्त्वाचे मानले जाणारे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर त्यांनी शिवसेना (Shivsena) पक्षावर तसेच धनुष्यबाण चिन्हावर आपला दावा केला. या दाव्यामुळे यंदाच्या वर्षी राज्यात पहिल्यांदा शिवसेना पक्षाचे दोन दसरा मेळावे पार पडले. दसरा मेळाव्यावरून (धसरा मेळावा) देखील मोठे वाद झाले आणि अखेर ४ ऑक्टोंबरला शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरे यांचा तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला. दसरा मेळाव्याला गर्दी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी जवळपास दहा कोटी रुपये खर्च केला असल्याचं म्हटलं जातं आहे. याच पार्श्वभूमीवर वकील नितीन सातपुते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

नितीन सातपुते यांच्याकडून हायकोर्टात याचिका दाखल –

एकनाथ शिंदे यांनी जवळपास दोन लाख लोक जमा केल्याचा आकडा मुंबई पोलिसांनी दिला आहे. राज्यभरातून सतराशे बस आणण्यात आल्या, एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही तशी माहिती दिली. शिंदे गट हा अधिकृत नसताना त्यांच्याकडे एवढे पैसे आलेस कुठून?, याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करत नितीन सातपुते (Nitin Satpute) यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

सातपुते यांची मागणी –

वेगवेगळ्या भागातून पैसे डिपॉझिट झाले, असल्याची माहिती एसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. हे कोणी दिले?, पैसे आले कुठून?, त्यामुळे दहा कोटी रुपये कोणाच्या अकाउंट मधून तिथे गेले?, वीस हजार किंवा दोन लाखांपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार झाला तर आयकर विभाग चौकशी करतो मग हे पैसे कुठून आले?, दहा कोटी रुपये एसटी स्वीकारते तेव्हा याची चौकशी झाली पाहिजे, यामध्ये भ्रष्टाचाराचे पैसे आला असून याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी या याचिकेमध्ये करण्यात आली आहे.

सीबीआय (CBI) किंवा ईडी (ED) यांनी दहा कोटी रुपयांमध्ये प्रत्येक रुपयाचा हिशोब विचारला पाहिजे. ज्यांनी पैसे भरले त्यांचे उत्पन्न केवढं आहे, याची देखील चौकशी करावी, समृद्धी महामार्गावरून आणण्यात आले तो रस्ता अजूनही कच्चा आहे, तिथे अपघात घडले मानवी जीवन धोक्यात घातलं, त्यामुळे कोणत्या अधिकाराखाली ही परवानगी दिली?, यावर देखील योग्य कारवाई करण्याची मागणी या याचिकेमध्ये केली आहे.

दरम्यान, कुणाकडे साडेचार कोटी रुपये आढळले तर त्यांना जेलमध्ये टाकलं जातं, न्याय हा सर्वांसाठी समान असून दहा कोटी रुपये भ्रष्टाचारातून आले असतील तर त्यांच्यावर मनी लाँन्ड्रींचा गुन्हा दाखल करण्यात यावा असं नितीन सातपुते यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!