Share

Maruti Car Update | 10 लाखांपेक्षा कमी किंमती असलेल्या ‘या’ आहेत मारुतीच्या लोकप्रिय कार

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती, कंपनीचा भारतीय कार मार्केटमध्ये वेगळाच दबदबा असून मारुती ही ग्राहकांची लोकप्रिय कार कंपनी आहे. देशात सर्वत्र तुम्हाला मारुतीच्या गाड्या बघायला मिळतील. कारण मारुतीच्या गाड्यांची किंमत इतर गाड्यांच्या तुलनेत थोडी कमी असते. यामध्ये 10 लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या बेस्ट मारुती कार सुद्धा उपलब्ध आहे. चला, जाणून घेऊया त्याबद्दल:

Maruti Alto K10

मारुतीने आपले Maruti Alto K10 हॅचबॅक अपडेटेड व्हर्जन नुकतेच लाँच केले आहे. ही कार या जनरेशनचे थर्ड मॉडेल आहे. Maruti Alto K10 ची सुरुवातीची एक्स-शोरुम किंमत 3.99 लाख रुपये एवढी आहे. तर, या मॉडेलच्या टॉप स्पेक व्हेरियंटची किंमत 5.84 लाखापर्यंत आहे. Maruti Alto K10 ही कार देशातील स्वस्त कार पैकी एक कार आहे.

WagonR

WagonR ही देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारपैकी एक आहे. भारतीय बाजारात या कारचे तब्बल 11 व्हेरियंट उपलब्ध आहेत. या गाडीची एक्स-शोरुम किंमत 5.44 लाख रुपये एवढी आहे. तर या मॉडेलच्या टॉप स्पेक व्हेरियंटची किंमत 7.08 (एक्स-शोरुम) आहे.

Maruti Swift

Maruti Swift ही कार तिच्या आकर्षक स्पोर्टी लूकसह मार्केटमध्ये उपलब्ध आहे. या कारच्या लूकमुळे बाजारात तिची विक्री मोठ्या प्रमाणात होते. Maruti Swift ची किंमत 5.91 लाखापासून सुरू होते. तर, ही कार बाजारामध्ये तिच्या 10 व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या गाडीच्या टॉप स्केप व्हेरियंटची एक्स-शोरूम किंमत 8.71 लाख रुपये एवढी आहे.

Maruti Celerio

Maruti Celerio या गाडीची देशात मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. कारण ही कार पेट्रोल आणि CNG दोन्ही वर्जनमध्ये उपलब्ध आहे. या कारची सुरुवातीची किंमत 6.49 लाख रुपये असून, तिच्या टॉप स्पेक मॉडेलची एक्स-शोरुम किंमत 9.71 लाख रुपये आहे.

Maruti Baleno

Maruti Baleno हे कंपनीचे टॉप मॉडेल आहे. याच वर्षी मारुतीने Baleno चे अपडेटेड व्हर्जन लाँच केले असून, ही कार मार्केटमध्ये 7 व्हेरियंट सह उपलब्ध आहे. या कारची सुरुवातीची किंमत 9.71 लाख रुपये (एक्स-शोरुम) एवढी आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!