Share

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचं भाषण ऐकण्यासाठी शिवसैनिकांची उत्सुक्ता, दुपार पासूनच शिवसैनिक जमा होण्यास सुरुवात

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना पक्षात फुट पडल्यामुळे आज मुंबईत एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट असे दोन मेळावे होणार आहेत. यामध्ये कोणाच्या दसरा मेळाव्याला जास्त गर्दी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. असातच उद्धव ठाकरे यांच्या मेळाव्याला दुपार पासूनच शिवसैनिक जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल :

हायकोर्टाचा निकाल उद्धव ठाकरेंच्या बाजूने लागल्यामुळे शिवतीर्थावर आज उद्धव ठाकरेंचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याची जोरदार तयारी सुरु असून शिवसैनिक दुपार पासूनच जमा होण्यास सुरुवात झाली आहे. शिवतीर्थावर पोस्टर लावण्यात आलं असलं तरी कोणत्या प्रकारच्या खुर्च्या लावण्यात आलेल्या नाहीयेत.

शिवतीर्थावर लांबून लोक स्वतःच्या खर्चाने पोहचले असून आपल्यासोबत भाकरी देखील घेऊन आले आहेत. एवढंच नाही उद्धव ठाकरे हेच आम्हा शेतकऱ्यांचे खरे नेते असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी लोक उत्सुक आहेत.

दरम्यान, गद्दारीच्या पिकाचा नायनाय करण्यासाठी देवीकडे प्रार्थना केली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा ऐतिहासिक असतो. महाराष्ट्रात शिवाजी पार्कवरुन विचारांचं सोनं लुटलं जातं. तसंच ते आजही लुटलं जाईल, असे अंबादास दानवे यांनी दसरा मेळाव्यापुर्वी म्हटलं आहे. दानवेंच्या या वक्तव्याला शिंदे गट काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!