🕒 1 min read
मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून सातत्याने विविध नेत्यांबाबत ते भाजपत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या पेरण्याचे काम केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याबाबत हाच प्रकार भाजपने केला होता. मात्र आता एकनाथ खडसे भाजप पक्षात समेट होऊच शकत नाही असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी केला आहे. अशातच शिंदे गटातील खासदार कृपाल तुमाने यांनी मोठा दावा केला आहे. शिवसेनेचे दोन खासदार आणि पाच आमदार आज शिंदे गटात प्रवेश कऱणार असल्याचं ते एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित असताना कृपाल तुमाने यांनी हि माहिती दिली आहे. यानंतर बोलताना त्यांनी सांगितलं की “मी गेल्या अनेक वर्षांपासून मोहन भागवत यांचे विचार ऐकण्यासाठी येत असतो. हिंदूंचं रक्षण करण्यासाठी लढणाऱ्या संघटनेच्या प्रमुखांचे विचार ऐकून पुढे जावं यासाठी येत असल्याचं ते यावेळी म्हणाले आहेत. याआधी बाळासाहेबांचे विचार ऐकण्यासाठी आम्ही मुंबईत जायचो. पण आता बीकेसीमध्ये भव्य कार्यक्रमात एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्यासाठी सर्वजण एकत्र येतील. राज्यात खऱ्या अर्थाने हिंदुत्वाची युती झाली आहे. शिंदे आणि फडणवीसांच्या नेतृत्वात राज्याला गतिमान सरकार मिळालं असल्याचं सांगत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
“राज्याचे ५० आमदार आणि १२ खासदार सोबत आहेत. आज बीकेसीच्या मैदानावर दोन खासदार, पाच आमदारांचा प्रवेश शिंदे गटात होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी शिवसेना असल्याचं तुमाने यावेळी म्हणाले आहेत. शिवसेनेला सदैव शिव्या देणाऱ्यासोबत आम्ही गेलेलो नाही,” अशी बोचरी टीका त्यांनी राष्ट्रवादीवर केली आहे.
जे आमदार, खासदार प्रवेश कऱणार आहेत त्यांची नावं संध्याकाळीच सर्वांना कळतील. मुंबई, मराठवाडा कुठलेही ते असू शकतात. प्रभावी खासदार आमच्याकडे आलेले दिसतील. ज्या आमदारांना, खासदारांना आमचे विचार पटत आहेत, ते आमच्याशी संपर्क साधत सोबत येण्याचा प्रयत्न करत आहेत. जे येतील त्यांना सोबत घेऊ,” असं देखील त्यांनी यावेळी सांगितलं. शिंदे हाताकडून करण्यात आलेला हा दावा ठरणार का? कोणते आमदार-खासदार शिंदे गटात प्रवेश करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- asprit Bumrah । टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर गेल्यानंतर बुमराहनं मौन सोडलं; हृदय जिंकणारा संदेश शेअर केला
- Shivsena । आदित्य ठाकरेंनी सांभाळून बोलावं, आम्ही तोंड उघडलं तर…; गुलाबराव पाटलांचा थेट इशारा
- Shivsena । दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या शिंदे गटाच्या वाहनांचा अपघात; ८ ते १० गाड्या एकमेकांवर आदळल्या
- Weight Loss Tips | दररोज ‘ही’ योगासने केल्यामुळे होऊ शकते पोटावरील चरबी कमी
- INC । “शिंदे गटाने दसरा मेळाव्याच्या बसेससाठी १० कोटी रुपये कुठून आणले?, ही मनी लाँडरींग तर नाही ना?”; काँग्रेसची मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
