Share

Pankaja Munde | “इथे ना खुर्च्या लागल्या आहेत, ना खाण्या पिण्याची व्यवस्था आहे…”, पंकजा मुंडेंच्या मेळाव्यातील ‘त्या’ वाक्याने वेधलं लक्ष

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : सगळ्यांचे लक्ष आजच्या दसरा मेळाव्यावर लागले आहे. यंदा शिवसेना पक्षाचे दोन मेळावे होणार आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जात आहे.राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. तसेच या दसरा मेळाव्यावरून विरोधी पक्षनेते आणि सत्ताधारी पक्षनेत्यांमध्ये एकमेकांवक आरोप, टोलेबाजी करण्याची चढाओढ लागली असल्याचं पाहायला मिळतं आहे. अशातच भाजप (BJP) पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे(Pankja Munde) यांनी दसरा मेळाव्याव्यात एक वक्तव्य केलं आहे.

पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया :

दरवर्षी राज्यात दोन दसरा मेळावा असायचे. त्यातील एक मी दुपारी घ्यायचे, तर दुसरा मुंबईमध्ये व्हायचा. यावर्षी आणखीन एक मेळावा होत आहे, एकनाथ शिंदे यांचा असं म्हणत मी सर्वांना शुभेच्छा देते, तसेच या सर्व मेळाव्यातून जनतेचे, वंचितांचे, पीडितांचे, विषय प्राधान्याने घेतले जातील, अशी अपेक्षा पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

यादरम्यान, माझा मेळावा हा गरिबांचा, वंचिताचा असून गावाकडचा साधारण मेळावा आहे, इथे ना खुर्च्या लागल्या आहेत, ना खाण्या पिण्याची व्यवस्था आहे, लोक आपल्या घरातूनच भाकरी बांधून आणतात, माझ्यासाठी ही वेगळी ताकद आहे, मला मोठा आशीर्वाद आहे, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

मुंबई मेळाव्यातील शान शौकतीवर अप्रत्यक्षपणे निशाणा :

पंकजा यांनी आपल्या मनातील सर्वसामान्य लोकांची भावना व्यक्त करताना मुंबई मेळाव्यातील शान शौकतीवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला असल्याचं म्हटलं जात आहे. आमचा मेळावा डोंगरांमध्ये होतो, डोक्यावर ऊन असतं तरीही लोकांचा उल्हास असतो, असा माझा मेळावा असतो, माझा मेळावा हा पक्षाचा नसून वंचितांचा असतो, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्हीपैकी कोणत्या दसऱ्या मेळाव्यातील भाषण ऐकण्याची उत्सुकता आहे?, असा सवाल पंकजा मुंडे यांना विचारण्यात आला होता. त्यावर त्या म्हणाल्या की,मुंबईत आज दोन मेळावे होणार आहेत. हे मेळावे प्रचंड ताकदीने होत आहेत. सर्वांचे लक्ष या मेळाव्याकडे आहे. सर्व माध्यमांचं लक्ष या मेळाव्याकडे आहे. म्हणून मी दोघांनाही शुभेच्छा देते. आज पंकजा मुंडे यांचा भागवान गडावर दसरा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

शिवसेनेतील सर्व गोष्टींकडे मी कुतुहलाने बघते. कारण मी या गोष्टीतून गेले आहे. मी एका मेळाव्याचं सीमोल्लंघन करून दुसऱ्या मेळाव्याचं स्थान निर्माण केलं आहे. तुम्ही सावकरगावचं आमचं भगवान बाबांचं मंदिर बघितलं पाहिजे. आम्ही अत्यंत सुंदर आणि देखणं मंदिर उभं केलं आहे. तसंच मी या दोघांकडे कुतुहलाने बघते. आज त्यांच्यासाठी सिमोल्लंघनाचा खरा दिवस आहे. ते विषयांचं आणि जनतेच्या प्रश्नांचं सीमोल्लंघन करतील अशी अपेक्षा आहे.

तसेच, दुसरीकडे एकदम वेगळा दसरा मेळावा जिथं खुर्च्या मांडलेल्या नाहीत, डोंगर कपारीतील हा माझा मेळावा आहे. त्यामुळे हे तीन वेगवेगळे मेळावे होत आहेत आणि मोहन भागवत यांचं मार्गदर्शन असा हा दिवस वेगवेगळ्या अनुभवांनी भरलेला आहे. जनता हुशार आहे, ते सर्व पाहत असल्याचं मुंडे यांनी म्हटलं.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!