Share

Ajit Pawar | “शिंदे सरकारमधील काही आमदारांना सत्तेची मस्ती” ; ‘त्या’ प्रकरणावर अजित पवार भडकले

Published On: 

🕒 1 min read

उस्मानाबाद : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) सध्या उस्मानाबाद दौऱ्यावर आहेत. या दरम्यान बोलताना त्यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. शिंदे सरकारमधील आमदार आणि मंत्री बोलतात कसे? चुन चुन के, गिन गिनके मारू, असं हे लोक म्हणतात. असं बोलायला देशात काय मोगलाई आहे का?, असा सवाल अजित पवारांनी यावेळी राज्य सरकारला केला.

लोक डोक्यावर घेतात आणि मग पायाखाली घेतात. एकनाथ शिंदे (eknath shinde) सरकारमध्ये काही मंत्र्यांना, आमदारांना सत्तेची नशा आणि मस्ती आली आहे. अरे कारे सुरु आहे, यासाठी सत्ता घेतली आहे का?, असा खोचक प्रश्न अजित पवारांनी विचारला आहे.

कोणीच कोणाचा कायम विरोधी नसतो. सत्तेच्या लाटा येतात आणि जातात. त्यामुळे मी कधीही भेदभाव करीत नाही. त्यामुळे अनेक वेळेस आमदार झालो, असं देखील अजित पवार यावेळी बोलताना म्हणाले.

आमदारांना सत्तेची नशा चढली आहे-

राज्यात स्थापन झालेल्या शिंदे फडणवीस सरकारमधील काही मंत्री आणि आमदारांना सत्तेची नशा चढली आहे. अरे कारे करत आहेत. त्यांनी बोलताना भान ठेवलं पाहिजे. कोणाचा अपमान होईल असं काही करु नका असा सल्ला देखील अजित पवारांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!