🕒 1 min read
राज्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत होता. मात्र आज राज्यात पुण्यासह, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहे. आज पुण्यात सकाळ पासूनच ढगाळ वातावरण होते. आणि संध्याकाळी 5.30 च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसला सुरुवात झाली. काल (28 सप्टेंबर) रोजी रात्री पुण्यात पावसाच्या हलक्या सरी बरसात होत्या. त्यामुळे हवामान खात्याकडून पुणेकरांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातील या भागांमध्ये येल्लो अलर्ट
मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे,जळगाव,नाशिक आणि नगर या भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यातील औरंगाबाद,जालना,बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड लातूर आणि हिंगोली या परिसरांमध्ये देखील अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
राज्यात हलक्या प्रमाणात पाऊसाच्या सरी
राज्यात विविध ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. मंगळवारी दि. 27 सप्टेंबर रोजी मध्य महाराष्ट्रातील नगर,नाशिक,सोलापूर तर मराठवाड्यातील जालना,औरंगाबाद, परभणी,नांदेड या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला.
पुण्यासह राज्यात आज अनेक ठिकाणी विजांच्या कडकडासह पाऊसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे हवामान खात्याकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- Uddhav Thackeray | काही लोकं ढळली, पण खरे ‘अढळ’ माझ्यासोबतच! उद्धव ठाकरेंचा सणसणीत टोला
- Abdul Sattar | “…नाहीतर उद्धव ठाकरेंची शिवसेना दुर्बीणीने बघावी लागेल” ; अब्दुल सत्तारांचा खोचक टोला
- Eknath Shinde | “ज्यांच्या स्वतःबद्दल…”; अशोक चव्हाणांच्या दाव्यावर शिंदे गटाचा पलटवार!
- मोठी बातमी : T20 वर्ल्ड कपमधून जसप्रीत बुमराह संघाबाहेर
- Arjun Khotakar | चंद्रकांत खैरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर शिंदे गटाचे स्पष्टीकरण म्हणाले…
- Instagram Account Recovery | Instagram अकाउंट Hack झाल्यावर काय करायला पाहिजे,जाणून घ्या!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
