Share

INS | अध्यक्षपदासाठी अशोक गेहलोत यांच्या नावाची चर्चा वाढली; मुख्यमंत्री पदाचाही राजीनामा देणार?

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : सध्याच्या परिस्थितीमध्ये पाहिलं तर, काँग्रेस पक्ष हळू-हळू विस्कळीत होत चालला आहे. अशातच काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणूकीची चर्चा सगळीकडे सुरू आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे अध्यक्ष होणार असल्याच्या समजतं आहे. जर ते अध्यक्ष झाले तर त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार का?, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आज अध्यक्ष पदासोबतच राजस्थान मुख्यमंत्री पदाचाही निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विधीमंडळ पक्षाची आज बैठक होणार आहे. ही बैठक जयपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणार असून, त्याठिकाणी राजस्थानच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या निवडीबाबतही ज्येष्ठ नेत्यांबरोबर चर्चा केली जाणार आहे.

त्याचबरोबर सोनिया गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पद आणि राजस्थान मुख्यमंत्री निवडीसाठी मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ही माहिती काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून ट्विट करत दिली आहे.

दरम्यान,काँग्रेससाठी ही बैठक महत्त्वाची असल्याने अनेक या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे अशोक गेहलोत यांना काँग्रेस अध्यक्ष पद मिळाल्यानंतर राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!