Share

Gulabrao Patil | “आमचा दसरा मेळावा बघायला बाळासाहेबांचा आत्मा येईल! अन् उद्धव ठाकरेंच्या…”, गुलाबराव पाटलांचा टोला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : शिवसेना पक्षाची परंपरा असलेला दसरा मेळावा शिवतीर्थावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असल्याचं समोर लं आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचाच दसरा मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील दुसऱ्या ठिकाणी घेणार आहेत. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन चांगलाच वाद पेटला असून शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला आहे.

गुलाबराव पाटील यांचा उद्धव ठाकरे यांना टोलाः

आमचा दसरा मेळावा हिंदुत्वाच्या विचारांचा आहे, मात्र, उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा शरद पवार आणि सोनिया गांधींच्या मिक्स विचारांचा होणार असल्याची टीका गुलाबराव पाटलांनी केली आहे. आमचा दसरा मेळावा बघायला बाळासाहेबांचा आत्मा येईल!, असंही मंत्री गुलाबराव पाटील यावेळी म्हणाले आहेत.

मधल्या काळात आम्ही हिंदुत्वाच्या विचार सोडून दुसऱ्या ट्रॅकला गेलो होतोः

मधल्या काळात आम्ही हिंदुत्वाच्या विचार सोडून दुसऱ्या ट्रॅकला गेलो होतो, पण आता पुन्हा हिंदुत्वाच्या विचारांसाठी भगवा झेंडा आम्ही हाती घेतला आहे, असं म्हणत गुलाबराव पाटलांनी आपला अजेंडा स्पष्ट केला आहे.

बीकेसीतील मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावाः

दरम्यान, बीकेसीतील मैदानावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाचा अर्ज महापालिकेने स्विकारल्याची माहिती देखील समोर येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेच्या वतीने देखील दसरा मेळाव्यासाठी बीकेसीतील मैदानाची मागणी करण्यात आली होती. मात्र महापालिकेकडून शिवसेनेचा अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!