Share

Nikhil Wagle । मराठी ‘भाऊबळी’ चित्रपटाचा शो रद्द झाल्याने निखिल वागळेंची संतप्त फेसबुक पोस्ट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई । सध्या चित्रपट सृष्टीतील मराठी चित्रपट फारसे बॉक्स ऑफिसवर चालताना दिसत नाहीयेत. तसेच चित्रपट पाहायलाही कोणी जाताना दिसत नाहीये. नुकताच प्रसिद्ध झालेल्या भाऊबळी मराठी चित्रपटाचा शो रद्द करण्यात आला होता. प्रेक्षक नसल्यामुळे शो रद्द झाल्याचे सांगण्यात आले होते. याबाबत जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी फेसबुक वर पोस्ट लिहीत मराठी प्रेक्षक कुठे गेले असा प्रश्न विचारत संताप व्यक्त केला.

कुठे गेला मराठी प्रेक्षक? निखिल वागळे यांची फेसबुक पोस्ट

मोठ्या अपेक्षा ठेऊन शनिवारी दुपारी ‘भाऊबळी’ पहायला गेलो. दुपारी २ वाजता, स्टारसिटी माटुंगा. बुक माय शो वरुन आधीच तिकीटं काढल्यामुळे कसलीच गडबड नव्हती. थिएटरबाहेर सात-आठ तरुण मुलं गप्पा मारत होती. तरुण प्रेक्षक भाऊबळीला मिळतोय हे पाहून बरं वाटलं. पण डोअरकिपरने पहिला धक्का दिला. ‘ये तो शो है नही..कॅन्सल हुआ है!’

‘अरे बापरे, असा कसा शो रद्द करता तुम्ही?’ माझा आवाज ऐकून एक मॅनेजरसारखा दिसणारा तरुण पुढे आला. ‘ काय करणार साहेब. तुमच्या दोनच तिकिटांचं बुकिंग होतं. तुम्हाला मेल आली असेल बघा.’ त्याचं बरोबर होतं. बुक माय शोची भाऊबळीचा शो रद्द झाल्याची आणि रिफण्डची मेल आली होती. याचा अर्थ शो रद्द करण्याचा निर्णय आदल्या दिवशीच झाला होता. भाऊबळी बघायची माझी इच्छा तीव्र होती. मग सिटीलाईटला जायचं ठरवलं. तिथे सकाळी ११चा शो आहे असं वाचलं होतं. निदान ॲडवान्स बुकिंग तरी करता आलं असतं. पण तिथे गेलो तर भाऊबळीचा पत्ताच नाही. सकाळी ११ वाजता ब्रह्मास्त्रची पाटी होती.

हा सगळा प्रकार धक्कादायक होता. माटुंगा-माहिमसारख्या मराठी बालेकिल्यात मराठी सिनेमाला प्रेक्षक मिळत नसतील तर मराठीपणाच्या गप्पा कशाला मारायच्या? त्यातून सिनेमा क्षुल्लक असेल तर गोष्ट वेगळी. भाऊबळीसारखा जाणकारांनी स्तुती केलेला सिनेमा पहावा असं मराठी माणसाला का वाटत नाही? हाच प्रकार वांद्रे, बोरिवलीमध्ये घडत असल्याचं फेसबुक पोस्टवरुन कळलं. सिनेमागृहात मराठी सिनेमाला शेवटची गर्दी पाहिली ती सैराटला.अलिकडे पाहिलेल्या झिम्मालाही अर्धच थिएटर भरलेलं होतं. एरवी २५-३० पलिकडे मराठी प्रेक्षकांची संख्या जात नाही.

मराठी संस्कृती वाचवण्याच्या गप्पा मारणं सोपं आहे. पण दर्जेदार मराठी पुस्तकं पडून रहाणार असतील, चांगल्या सिनेमा-नाटकांना प्रतिसाद मिळत नसेल, अभिजात संगीत-कला याकडे तरुण वर्गाचं दुर्लक्ष होणार असेल तर मराठी संस्कृती कशी काय जिवंत रहाणार आहे? मराठी अस्मिता जपण्याच्या घोषणा निवडणुकीत करुन कदाचित मतं मिळतील, मराठी संस्कृतीला काहीही हातभार लागणार नाही. की गोविंदा-गणपतीत बिभत्सपणे नाचण्यापुरताच तथाकथित मराठीपणा शिल्लक आहे?
असो.

भाऊबळी मी पाहीनच. तुमचं काय ते तुम्ही ठरवा –निखिल वागळे

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!