🕒 1 min read
Jitendra Awhad | मुंबई : महाराष्ट्रात एखादा चित्रपट प्रदर्शित झालाय आणि त्यावर वाद झाला नाही असं क्वचितच घडतं. विशेषतः इतिहासावर आधारित चित्रपट नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतात. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पराक्रमी मावळे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्यावर आधारित ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. तसेच, ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudle Saat) हा सुद्धा चित्रपट आगामी काळात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटांमधून इतिहासाची मोडतोड होत असल्याचा दावा संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी केलाय. यासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) देखील आक्रमक झालेत.
‘हर हर महादेव’ आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटांत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीच्या इतिहासाची मोडतोड करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. हर हर महादेव या चित्रपटाला विरोध म्हणून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी रात्री ११ वाजता ठाण्यात आंदोलन केले.
यामुळे आता ठाण्याच्या वर्तकनगर पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधानाच्या १४१, १४३, १४६, १४९, ३२३, ५०४, अशा वेगवेगळ्या कलमांतर्गत आव्हाड यांच्यासह त्यांच्या १०० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्तकनगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात पुढे काय होणार हे पाहावं लागणार आहे.
काय म्हणालेत जितेंद्र आव्हाड? (Jitendra Awhad)
“शिवाजी महाराजांच्या मांडीवरती अफजलखान झोपून आहे आणि त्याचा कोथळा फाडला आहे. हे इतिहासात कुठेच नाहीय,” असं आव्हाड म्हणाले. त्याचप्रमाणे ‘हर हर महादेव’ चित्रपटामध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाईचं दृष्य दाखवण्यात आलं असून त्यालाही आव्हाड यांनी विरोध केला आहे. “बाजीप्रभू छत्रपती शिवाजी महाराजांशी लढायला गेले आहेत. हे कुठे दिसलं? बाजीप्रभूंनी शिवाजी महाराजांशी लढाई केली. बाजीप्रभू सच्चा सेवक होता शिवाजी महाराजांचा,” असं मत मांडत आव्हाडांनी या चित्रपटांना विरोध केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shrikant Shinde | “आदित्य ठाकरेंच्या सभेला आम्ही कुठून लोकं आणायचो आम्हाला माहिती आहे”, श्रीकांत शिंदेंचा घणाघात
- Aditya Thackeray | “… म्हणून देवेंद्र फडणवीसांची प्रतिमा मलिन होत आहे”, आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर घणाघात
- Rohit Pawar | “…तर आम्ही सत्तारांचं विधान विसरून जाऊ”, अब्दुल सत्तारांच्या ‘त्या’ वक्तव्यावर रोहित पवारांचं मोठं विधान
- Aditya Thackeray | “… म्हणून हे सरकार पडणार”, आदित्य ठाकरेंनी सांगितलं सरकार पडण्याचा मुहर्त अन् कारण
- NCP | आरोप, राडा, या सर्वांनंतर घोडगंगा साखर कारखन्यावर पवारांचं राज्य
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
