🕒 1 min read
औरंगाबाद : मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे. या दिनानिमित्त औरंगाबादमध्ये कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असून, त्यांच्या हस्ते ध्वजारोहन झालं असल्याचं समजतं आहे. परंतू हा कार्यक्रम सकाळी सात वाजता, असल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. अशातच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही शिंदेंवर हल्ला केला आहे.
काय म्हणाले अंबादास दानवे ?
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही. एकनाथ शिंदे दिल्लीच्या पातशाह यांच्या आदेशावरून निर्णय घेतात, असं म्हणत अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे ते असंही म्हणाले की, दिल्लीच्या पातशाहांच्या आदेशावरूनच मुख्यमंत्री हैदराबादला जात आहेत.
दरवर्षी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम सात वाजता होतो. परंतू यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी सात वाजता आले आणि कार्यक्रम झाला. परंतू आम्ही दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सकाळी 9 वाजताच शासकीय ध्वजारोहण करणार असल्याचं अंबादास दानवे यांनी सांगितलं आहे. सात वाजता कार्यक्रम करून तर करून मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा मुक्तिसंग्रामाला कमी वेळ दिला. केवळ पंधराच मिनिटांमध्ये एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण कार्यक्रम आटोपला असल्याचं दानवे यांनी म्हटलं.
दरम्यान, हैदराबादमध्ये महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक, या तीन राज्यांचा मिळून मुक्तिसंग्रामचा एक संयुक्त कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हजेरी लावणार आहेत. या कार्यक्रमासाठी वेळेत पोहोचता यावं, यासाठी एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादमधील ध्वजारोहणाचा कार्यक्रम लवकर घेण्यातला असल्याचं समजतं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | मराठवाड्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी निर्धाराने प्रयत्न – एकनाथ शिंदे
- Girish Mahajan | “ठाकरे सरकारला वाईनसाठी बैठक घ्यायला वेळ मिळाला, मात्र प्रकल्पासाठी वेळ नव्हता”
- Eknath Shinde | वेदांता प्रकल्प गुजरातला कसा गेला?, एकनाथ शिंदे म्हणाले…
- Gulabrao Patil | “अजित पवारांनीही सकाळचा शपथविधी केला होता, मग आम्ही त्यांनाही गद्दार म्हणायचे का?”
- Narayan Rane | हातातून सत्ता गेल्यापासून आदित्य ठाकरे सैरभैर झाले आहेत – नारयण राणे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
