🕒 1 min read
पुणे : वेदांत ग्रुप व फोक्सकॉनचा सेमीकंडक्टर चिप निर्मितीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. त्यामुळे दीड लाख तरूणांचा रोजगार गेला आहे. या सगळ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात याचे पडसाद उमटलेले पाहण्यास मिळाले. हा प्रकल्प राज्यातून जाण्यासाठी सध्याच सरकार जबाबदार असल्याचं विरोधी पक्षनेते म्हणत आहेत. तर सत्ताधरी विरोधकांवर आरोप करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या प्रकरणावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले शरद पवार ?
मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री या दोघांचं वक्तव्य असं होतं की मागच्या सरकारच्या काळात या प्रकल्पासंदर्भात काही निर्णय घेतला नाही. या सगळ्यासाठी उद्धव ठाकरे सरकार जबाबदार आहे. उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उदय सामंत मंत्री होते आणि एकनाथ शिंदे मंत्री होते. हे दोघे ज्या मंत्रिमंडळात होते, त्या मंत्रीमंडळाने दुर्लक्ष केल्याचे आरोप त्यांनी केले. परंतू मला वाटतं हे शहाणपणाचं लक्षण नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
काल पुण्यामध्ये पत्रकार परिषदत आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शरद पवार यांना महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेलेल्या प्रकल्पासंदर्भात विचारण्यात आलं असता तेव्हा ते बोलत होते. पुढे ते असंही म्हणाले की, प्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीची चर्चा झाली. ते मदत करतील असं सांगितलं जात आहे. तसं झालं तर आनंदच आहे. मात्र अशातच आणखीन एक प्रकल्प महाराष्ट्राला देऊ असं म्हटलं जात आहे. हे म्हणजे एका घरात एका लहान मुलाला एक फुगा दिला, दुसऱ्या मुलाच्या हट्टानंतर त्याला त्याहून मोठा फुगा देऊ असं सांगण्यासारखं आहे.
दरम्यान, वेदांता-फॉक्सकॉनचा संलग्न प्रकल्प महाराष्ट्र उभारणार,असं वेदांता प्रकल्पाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी सांगितलं आहे. यावरून दुसऱ्या प्रकल्पाचं राज्यातील जनतेला गाजर नका दाखवू, असं म्हणत विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी राज्य सरकारला फटकारलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ajit Pawar । आता बाळासाहेब असते तर बिन पाण्याने केली असती; अजित पवारांची शिंदे गटावर आक्रमक टीका
- Explainer | 1.54 लाख कोटींचा वेदांता फॉक्सकॉन-प्रकल्प काय आहे, तो महाराष्ट्रातून गुजरातमध्ये कसा गेला?
- Fitness Tips | ‘हे’ एरोबिक व्यायाम महिलांचे वजन कमी करण्यासाठी आहेत सर्वोत्तम, तणाव देखील होतो कमी
- Ajit Pawar | शिवसेनेतून बाहेर पडलेले पुन्हा निवडून देखील आले नाहीत – अजित पवार
- Sonam Kapoor Baby | मैत्रीण स्वरा भास्करचा सोनम कपूर बद्दल मोठा खुलासा! म्हणाली, “ती एक…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
