Share

Ajit Pawar | शिवसेनेतून बाहेर पडलेले पुन्हा निवडून देखील आले नाहीत – अजित पवार

Published On: 

जळगाव : शिंदे सरकार कुणाच्या दबावाखाली काम करतय का? विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा सवाल केला आहे. ५० खोके एकदम ओक्के म्हटल्यावर शिंदे गटातील आमदारांना मिर्च्या झोंबल्या असे म्हणत अजित पवारांनी टोला देखील लगावला आहे. तसेच शिवसेना सोडलेला एकही जण निवडून आला नाही, असा इशारा अजित पवारांनी शिंदे गटाला दिला. यावेळी त्यांनी राणे, भुजबळ यांचे उदाहरण दिले.

अजित पवार म्हणाले, आरे ला कारे करा, लाथा घाला फोडून काढा मोगलाई लागली आहे का? हे महाराष्ट्राने कधी पाहीलं नव्हत. हे भाजपला कसं पटते हे मला कळलेलं नाही. एकनाथ शिंदे का गप्प बसतात हेही आम्हाला कळलेलं नाही. आतापर्यंत खूप दिग्गज नेते शिवसेनेतून बाहेर पडले पुन्हा ते निवडून देखील आले नाहीत.

अजित पवार यांचे एकनाथ शिंदेंना टोमणे –

मुख्यमंत्र्यांच्या सकाळी ६ वाजता झोपण्याच्या वक्तव्यावरुन अजित पावर यांनी चांगलेच टोमणे लगावले. “एकनाथ शिंदे म्हणाले मी सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतो, मग हे उठतात कधी? २४ तास माणूस एक-दोन दिवस काम करु शकेल. किंवा सुरतला गेल्यावर आता पद मिळणार म्हणून जागू शकेल. पण कधीतरी मेंदू म्हणेल, अरे झाेप…झोप. सहा तास तरी झोप पाहीजे. आम्ही ५५ वर्ष शरद पवारांच काम पाहील आहे. ते रात्री दोन वाजता जरी झोपले तरी सकाळी ७ ला तयार असायेच. पण ते देखील ५ ते ६ तास झोप घ्यायचे. पटेल असं बोलावं राव लय पुढचं बोलायला लागलाय. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात, आम्हाला आदार आहे. पण तुम्ही न पटण्यासारखे बोलायला लागल्यावर आम्हालाही बोलायला लागणार”, असे अजित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!