🕒 1 min read
मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले रविवारी कोकणातील राजापूर दौऱ्यावर असताना रिफायनरी विरोधी संघटनेचे नेते नरेंद्र जोशी यांनी नाना पटोले आणि पोलीस प्रशासनासमोर उद्योगमंत्री उदय सामंत यांना जाळून टाकण्याची धमकी दिली होती. त्यांच्या या धमकीवर उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
उदय सामंत यांचे वक्तव्य-
मी सुद्धा कोकणातला आहे. त्यामुळे मी दादागिरीला घाबरत नसल्याचे उदय सामंत यांनी म्हटलं आहे. आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले की, अशा प्रकारची प्रवृत्ती वाढू नये यासाठी पोलीस योग्य ती कारवाई करतील.
नाना पटोले यांच्यासमोर अशा प्रकारचे वक्तव्य करण्यात आलं असेल तर त्यांनी तिथं थांबवायला पाहिजे होतं. माणूस रागाच्या भरात जे बोलत असतो ते योग्य की अयोग्य हे बाजूला बसलेल्या नेत्यांना कळायलं हवं.
तसेच, पोलिसांसमोर एखादी गुंड प्रवृत्तीची व्यक्ती मंत्र्याला जाळून टाकण्याची धमकी देते. मंत्र्यांच्या तंगड्या तोडू असं वक्तव्य करते. मात्र, पोलीस यावर काहीही कारवाई करत नाहीत. ही दखल घेण्यासारखी गोष्ट आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा करणार असल्याचंही उदय सामंत यांनी सांगितलं
महत्वाच्या बातम्या :
- Dussehra Melava | दसरा मेळाव्यासाठी शिंदे सरकारने कसली कंबर, मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक
- Atul Bhatkhalkar | शरद पवारांच्या एंट्रीला लावलेल्या ‘त्या’ गाण्यावरुन अतुल भातखळकर म्हणाले…
- Ajit Pawar | राष्ट्रवादीतही भूकंप होणार? अजित पवारांच्या भूमिकेमुळे शरद पवार तणावात!
- Ajit Pawar | राज्यात अजूनही पालकमंत्री नसल्याने अजित पवार संतापले, म्हणाले…
- Ajit Pawar | “गर्दी जमवण्याची वेळ आली असेल तर…”; अजित पवारांचा एकनाथ शिंदेंवर हल्ला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
