🕒 1 min read
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची औरंगाबादमध्ये सभा आहे, त्यासाठी त्यांनी अंगणवाडी सेविकांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले असल्याची मािहिती समोर आली आहे. यावरून राज्यात खूप चर्चा रंगत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी या मुद्यावरून एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले अजित पवार ?
गर्दी जमवण्यासाठी आत्ताच्या मुख्यमंत्र्यांवर ही वेळ आली असेल, तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, असं म्हणत अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर हल्ला केला आहे. विधानभवनातील वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत घेण्यात आली. त्यावेळी अजित पवार बोलत होते.
पुढे अजित पवार म्हणाले की, 8 सप्टेंबर 2022 ला एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या औरंगाबादमधील अधिकाऱ्यांनी खुशाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या 12 सप्टेंबरच्या पैठण मतदारसंघातील सभेला प्रकल्पातील सर्व पर्यवेक्षिका, ४२ गावांमधील अंगणवाडी सेविका, मदतनीसांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनाही सूचना करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात अशी पद्धत कधीच नव्हती.
तसेच, ही सभा एकनाथ शिंदेंची राजकीय सभा असेल तर अशाप्रकारे सरकारी कर्मचाऱ्यांना बोलावण्याचं काहीच कारण नाही. त्याचबरोबर अंगणवाडी सेविका, मदतनीस सभेला गेल्या तर तेथील मुलांनी काय करायचं, ते कुठे जाणार? त्या मुलांकडे लक्ष कोण देणार?, असे सवालही अजित पवार यांनी या ठिकाणी उपस्थित केले आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Sada sarvankar | सदा सरवणकरांना गोळीबार करणं पडलं महागात, पिस्तुल ताब्यात घेण्यासाठी पोलीस दाखल
- Ajit Pawar | नाराजी नाट्यावर अजित पवारांचे स्पष्टीकरण! म्हणाले, “वास्तविक मला तिथं कोणी…”
- Neelam Gorhe | “नितेश राणेंच्या हातात मच्छर मारायची बॅट, त्याने…” ; नीलम गोऱ्हेंची टीका
- Uday Samant | नाना पटोलेंसमोर रिफायनरी विरोधकांकडून उदय सामंतांना जाळून टाकण्याची धमकी
- Anil Parab | अखेर पर्यावरण विभागाकडून आदेश! अनिल परबांचं रेसाॅर्ट होणार जमीनदोस्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
