🕒 1 min read
नाशिक : सध्या राज्यामध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यामध्ये आगामी निवडणूकांची सर्व पक्षाची तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे पक्षनेते विरोधी पक्षनेत्यांवर आरोप करताना दिसून येतं आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण हवा?, हे सांगितलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांचे वक्तव्य-
महाराष्ट्र राज्याचे अष्टपैलू कर्तृत्वान व्यक्ती देवेंद्र फडणवीस हे लोकनेते आहेत. त्यामुळे या राज्याचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस हेच यापुढे राज्याचे मुख्यमंत्री राहिले पाहिजे, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. काल चंद्रशेखर बावनकुळे श्री संताजी मंडळ, नाशिक आणि श्री संताजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमासाठी नाशिकमध्ये होते. त्यावेळी ते मुख्यमंत्री व्हावेत असं बोललं जात होतं. त्यावर त्यांनी हे वक्तव्य केलं असल्याचं समजतं आहे.
देवेंद्र फडणवीस धर्म, पंथाच्या बाहेर जाऊन निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी माझ्या पाठीमागे राहून मला प्रचंड शक्ती आणि ऊर्जा दिली. त्यांच्यामुळंच आमच्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांना मंत्रिपदं मिळाली आहेत. त्यामुळे आपण त्यांचं नेतृत्व मानलं पाहिजे.
तसेच, त्याठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यानंंतर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यावेळी ते म्हणाले की, गजानन नाना शेलार तुम्ही फार दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहू नका. तुमची गरज आम्हाला आहे. असं म्हणून बावनकुळे यांनी शेलार यांना भाजपात येण्याची ऑफर दिली असल्याचं समजतं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena | “महाराष्ट्राची सत्ता ओरबाडून घेतल्यावर तरी भाजपचा आत्मा शांत होईल असे वाटले होते; पण…”; शिवसेनेचा हल्लाबोल
- Navneet Rana | नवनीत राणा यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद
- Aditya Thackeray । कदम पिता-पुत्रांचा आदित्य ठाकरे घेणार समाचार; दापोलीत १६ सप्टेंबरला ‘निष्ठा यात्रा’
- Ajit Pawar | आजित पवार पुन्हा नाराज! दोन वेळा सभागृह सोडून गेल्याने चर्चेंना उधाण
- Shivsena Vs Shinde: दादर राड्याप्रकरणी जामीन मिळालेल्या 5 शिवसैनिकांचं मातोश्रीवर कौतुक, उद्धव ठाकरे म्हणाले..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
