🕒 1 min read
मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन मुंबई पालिका निवडणुकी बाबत बैठक घेतली होती. यावेळी अमित शहांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घनाघाती टीका केली होती. आता यालाच उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांचं अमित शहा यांच्या टीकेला उत्तरः
मुंबईत काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती बघितले, काल गणपतीच्या मंडपात देखील राजकारण दिसलं, गणपती जिथे आहे तिथे काही बोलू नाये पण ते बोलून गेले, गणपती हा बुद्धीचा दाता आहे, त्यांनी सर्वांना सद्बुद्धी द्यावी, असा टोला उद्धव ठाकरे यांनी अमित शहांना लगावला आहे. काल ते जमीन दाखवायची म्हणाले थोडक्यात काय संघर्षाचा काळ आहे, ते शिवसेना संपवायला निघाले आहेत, निष्ठाही कितीही बोली लावली तरी विकली जाऊ शकत नाही, पसाराभर नासलेली लोक असल्यापेक्षा मूठभर निष्ठावान असतील तर मैदान जिंकू शकतो, ही काय माझी खाजगी मालमत्ता नाही, असं देखील ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्रीपद हवं असतं तर मी क्षणभरात सोडलं नसतं, माझ्याकडे तेव्हाही 30-40 आमदार होते, तेव्हा त्यांना डांबून ठेवता आलं असतं, माझी ही ममता बॅनर्जी सोबत ओळख होती, त्यांना तिकडे घेऊन गेलो असतो, किमान कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं, राजस्थान त्यांना नेता आलं असतं, पण तो माझा स्वभाव नाही, त्यामुळे सगळ्यांना सांगितलं दरवाजा उघडा आणि राहायचं असेल तर निष्ठेने रहा, नसेल तर तिकडेच जावा, आता माझ्यासोबत कडवड शिवसैनिक आहेत, असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं आहे.
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप शिवसेनेचा विजय होईल, असा विश्वास व्यक्त करत अमित शहांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. एवढंच नाही तर उद्धव ठाकरेंनी भाजपला धोका देऊन विश्वासघात केला असल्याचा आरोप देखील अमित शहांनी केला होता.
महत्वाच्या बातम्याः
- Sanjay Gaikwad | “चून चून के, गिन गन के मारेंगे…”, संजय गायकवाडांची शिवसैनिकांनी धमकी
- Chandrakant Khaire | जी बाई पिक्चरमध्ये सिगारेट ओढते, ती आम्हाला शहाणपण शिकवते का? चंद्रकांत खैरे भडकले
- Sanjay Gaikwad | तुमच्या बापाने शेकोट्या नाही पेटवल्या, तुम्ही काय महाराष्ट्र पेटवणार ; संजय गायकवाड आक्रमक
- Supreme Court | सुप्रिम कोर्टातून मोठी बातमी! शिवसेना कोणाची? या प्रश्नावर उद्या होणार घटनापीठ स्थापन
- Eknath Shinde | शिवसेनासाठी एकनाथ शिंदे गटाची सुप्रिम कोर्टात धाव, याचिका दाखल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
