🕒 1 min read
मुंबई : सुप्रीम कोर्टाने तत्काळ सुनावणी घेऊन निवडणूक आयोगाची प्रक्रिया सुरू ठेवण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी एकनाथ शिंदे गटाने केली आहे. शिवसेना आणि शिंदे गटाच्या याचिका कोर्टात प्रलंबित आहेत. अशातच शिवसेना कोणाची या प्रकरणाची सुनावणी निर्णयक टप्प्यावर असल्याची माहिती सुप्रिम कोर्ट कडून देण्यात आली आहे.
सुप्रिम कोर्ट कडून अश्वासनः
शिवसेना आणि शिंदे गटाच्या वादावर उद्या बुधवारी घटनापीठाची स्थापना केली जाईल, असे आश्वासन सर्वोच्च न्यायालयाने दिलं आहे. त्यामुळे राज्यातील सत्तासंघर्षावर आता सुनावणी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सरन्यायाधीश यू यू ललित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने उद्या खंडपीठाची स्थापना केली जाईल, असे आश्वासन दिलं आहे. त्यामुळे लवकरच या प्रकरणावर 5 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे सुनावणी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एकनाथ शिंदे गटाची सुप्रिम कोर्टात धावः
सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठा समोर ही सुनावणी होत असून सुनावणी होईपर्यंत केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय देऊ नये, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मात्र, कोर्टाच्या निर्णयाआधीच शिवसेना पक्षाविषयी निर्णय लागणं महत्त्वाचं असल्याचं शिंदे गटाने म्हटलं आहे.
दरम्यान, आगामी काळात काही निवडणुकांच्या आधी शिवसेना पक्षाचे चिन्ह आणि इतर बाबींचा निकाल लागणं आवश्यक आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने तात्काळ सुनावणी घ्यावी, निवडणूक आयोगाची सुनावणी सुरू ठेवण्याबाबत स्पष्टता करावी, अशी विनंती याचिका अर्थात रीकट याचिका शिंदे गटाकडून करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Eknath Shinde | शिवसेनासाठी एकनाथ शिंदे गटाची सुप्रिम कोर्टात धाव, याचिका दाखल
- Solapur। निषेध करणारे सेनेचे नव्हे तर राष्ट्रवादीचे..! सेना उरलीच कुठे? चर्चेतले सावंत पुन्हा वादात
- Gulabrao Patil | आदित्य ठाकरेंनी वयाचा विचार करावा, नाहीतर…; गुलाबराव पाटलांचा इशारा
- Raosaheb Danve | “ज्यांच्यासोबत 40 आमदार आहेत त्यांचाच दसरा मेळावा शिवाजी पार्कवर व्हावा”, रावसाहेब दानवे
- Sanjay Shirsat | “… म्हणून मुंबईला निघालो”, नाराज संजय शिरसाट अखेर निघाले मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
