🕒 1 min read
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होणाऱ्या भेटीवरून मनसे आणि भाजप यांची युती होण्याची शक्यता आहे. अशी चर्चा देखील मोठ्या प्रमाणात रंगू लागली आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचीही जवळीक वाढत असल्याचं दिसून येत आहे.
राज ठाकरे घेणार एकनाथ शिंदे यांची भेटः
एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थावर निवासस्थानी गणपतीच्या दर्शनासाठी गेले होते. तर आता राज ठाकरे वर्षा बंगल्यावर जात शिंदेंची भेट घेणार असल्याचं समोर आलं आहे. राज्यात सध्या गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री निवासस्थानी गणराज दर्शन घेण्यासाठी राज ठाकरे जाणार असल्याचं समोर आलं आहे.
राज ठाकरे-शिंदे-फडणवीस यांच्यातील वाढती जवळीक पाहता युतीची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई पालिका निवडणुकीच्या तोंडावर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही युती होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात रंगली आहे. अशीष शेलार यांच्या घरी देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात दाराआड भेट झाली होती. यावरून देखील भाजप-मनसे युतीच्या चर्चेने जोर धरला होता. मात्र ह्या चर्चा किती पर्यंत खऱ्या आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
महत्वाच्या बातम्याः
- Navneet Rana | ही तर फक्त सुरुवात आहे पिक्चर अभी बाकी है – नवनीत राणा
- Eknath Shinde | एकनाथ शिंदे घेणार राज्यापालांची भेट, नवीन 12 आमदारांची यादी तयार
- Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचं मिशन विदर्भ देणार उद्धव ठाकरेंना टक्कर?
- Chandrashekhar Bawankule | धोकेबाजांना पळास्ता करायचे आहे – चंद्रशेखर बावनकुळे
- Navneet Rana | “तु ठाकरे है, तो मै भी राणा हूं…”, नवनीत राणा एकरी भाषा वापरत उद्धव ठाकरेंवर बरसल्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
