Share

आज IND vs HK सामना! चार वर्षांपूर्वी हाँगकाँगच्या सलामी जोडीने उधळला होता भारताचा डाव

Published On: 

🕒 1 min read

India vs Hong Kong: UAE मध्ये सुरु असलेल्या आशिया कप 2022 मध्ये आज भारतीय संघ (टीम इंडिया) हाँगकाँगशी भिडणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. विशेष म्हणजे चार वर्षांपूर्वीही हे दोन्ही संघ याच स्टेडियमवर भिडले होते. योगायोग किंवा आणखी काही की त्या आशिया चषकातही ग्रुप-अ मध्ये भारत, पाकिस्तान आणि हाँगकाँग या संघांचा समावेश होता आणि आशिया चषक 2018 चा चौथा सामना भारत आणि हाँगकाँग यांच्यात खेळला गेला होता आणि यावेळीही आशिया चषकाचा चौथा सामनाही यांच्यात होणार आहे. फरक एवढाच आहे की त्यावेळी आशिया कप 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवला जात होता आणि यावेळी तो टी-20 फॉरमॅटमध्ये खेळवला जात आहे.

आशिया कप 2018 च्या त्या सामन्यात हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हाँगकाँगसारख्या कमकुवत संघाविरुद्ध भारतीय संघ 400 धावांपर्यंत मजल मारेल, अशी अपेक्षा होती, पण तसे होऊ शकले नाही. हाँगकाँगच्या गोलंदाजांनी चांगली रणनीती मांडत भारताला 285 धावांत रोखले. भारतासाठी शिखर धवन (127) आणि अंबाती रायडू (60) यांनाच मोठी खेळी करता आली. या सामन्यात किंचित शाहने 3 आणि एहसान खानने 2 बळी घेत शानदार कामगिरी केली.

हाँगकाँग सलामीच्या जोडीचे ऐतिहासिक प्रदर्शन-

आशिया कप 2018 च्या त्या सामन्यातयानंतर हाँगकाँगच्या फलंदाजीचा प्रश्न आला तेव्हा या संघाच्या सलामीच्या जोडीने भारताचे होश उडवले. निजाकत खान (92) आणि अंशुमन रथ (73) यांनी पहिल्या विकेटसाठी 174 धावांची भागीदारी केली. हे दोन्ही फलंदाज हाँगकाँगला विजय मिळवून देतील,असे वाटत होते. मात्र, पहिली विकेट पडताच सामन्याची दिशा बदलू लागली. भारतीय गोलंदाज खलील अहमद, युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या त्रिकुटाने बॅक टू बॅक विकेट्स घेण्यास सुरुवात केली आणि हाँगकाँगवर दबाव वाढवला. शेवटी, हाँगकाँगचा संपूर्ण संघ 50 षटकात 8 विकेट गमावून 259 धावाच करू शकला. अशा प्रकारे भारताने हा सामना अवघ्या 26 धावांनी जिंकला. म्हणजेच मधली एक-दोन षटके हाँगकाँगच्या बाजूने गेली असती तर सामन्याचा निकाल उलटू शकला असता.हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हाँगकाँगसारख्या कमकुवत संघाविरुद्ध भारतीय संघ 400 धावांपर्यंत मजल मारेल, अशी अपेक्षा होती, पण तसे होऊ शकले नाही. हाँगकाँगच्या गोलंदाजांनी चांगली रणनीती मांडत भारताला 285 धावांत रोखले. भारतासाठी शिखर धवन (127) आणि अंबाती रायडू (60) यांनाच मोठी खेळी करता आली. या सामन्यात किंचित शाहने 3 आणि एहसान खानने 2 बळी घेत शानदार कामगिरी केली.

भारताने बांगलादेशचा पराभव करून जिंकला होता आशिया कप 2018 –

आशिया चषक 2018 मध्ये भारत आणि पाकिस्तान गट-अ मध्ये अव्वल स्थान मिळवून सुपर-4 मध्ये पोहोचले होते. त्याचबरोबर अफगाणिस्तान आणि बांगलादेशने ब गटातून सुपर-4 मध्ये स्थान मिळवले होते. भारत आणि बांगलादेशने सुपर-4 मध्ये दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. भारताने अंतिम सामना 3 गडी राखून जिंकला होता.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!