🕒 1 min read
नगर : दिल्ली सरकारने एक मद्यधोरण उपक्रम सुरू केला आहे. त्या उपक्रमामुळे म्हणजेच नवीन मद्यविक्री धोरणामुळे मद्यपान व मद्यविक्रीला प्रोत्साहन मिळणार आहे. त्यामुळे या मुद्यावरून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पत्र लिहले आहे.
अण्णा हजारे यांनी नेमकं काय लिहिलं पत्रामध्ये-
मद्याची जशी नशा चढते तशी सत्तेची नशा आपणास चढली आहे, असं म्हणत अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना चांंगलाच टोला लगावला आहे. अण्णा हजारे यांनी त्यांच्या पत्रामध्ये जनलोकपाल आंदोलनाच्या निमित्ताने आपण व दिल्लीचे सध्याचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया अनेक वेळा राळेगण सिद्धी येथे आला होतात. त्या वेळी तुम्ही राळेगण सिद्धीतील व्यसनमुक्तीचे कौतुक केले होते. मात्र सत्तेत आल्यावर मात्र तुम्ही या गोष्टी विसरलात याची खंत वाटते, असं लिहिलं आहे.
त्या आंदोलनाचं उदिष्ट राजकीय पक्ष स्थापन करणे नव्हते-
दहा वर्षांपूर्वी दिल्लीतील जनलोकपाल आंदोलन स्थगित केल्यानंतर, 18 सप्टेंबर 2012 रोजी झालेल्या बैठकीत आपण राजकीय पक्ष स्थापन करण्याचा विचार बोलून दाखवला. मात्र आपला या गोष्टीला विरोध असल्याचंही त्यांनी त्या पत्रामध्ये म्हटलं आहे. त्या आंदोलनाचं उदिष्ट राजकीय पक्ष स्थापन करणे हे कधीच नव्हतं. जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांबद्दल जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला होता त्यामुळे त्या वेळी भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्यांनी देशभर फिरून जनजागृती, लोकशिक्षण करणे अपेक्षित होते.
तसेच पुढे अण्णा हजारे आपल्या पत्रामध्ये अरविंद केजरीवाल यांना असंही म्हणाले की, पण त्या मार्गाने आपण गेला असता तर सर्वसामान्यांची कुटुंबे उद्ध्वस्त करणारे मद्यधोरण आपण राबवले नसते.
महत्वाच्या बातम्या :
- Shivsena । तुमच्यात दसरा मेळावा घेण्याची हिंमत आहे का?; शिवसेनेचे शहाजीबापू पाटील आणि शिंदे गटाला आव्हान
- Mahesh Tapase | गैर भाजपशासीत राज्यातील सरकार पाडण्यामध्ये मोदी सरकारला रस – महेश तपासे
- Jayant Patil । “भाजपाला हिंदूत्वाशी घेणे-देणे नाही, तर…”; जयंत पाटलांनी सांगितले शिवसेना फोडण्यामागचे सर्वात मोठे कारण
- Devendra Fadnavis । उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा
- Eknath Shinde । विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया; एकनाथ शिंदेंकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
