🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करून सरकार स्थापन केलं आहे. तेव्हापासून सत्ताधारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये चांगली टोलेबाजी सुरू असते. तसेच सध्या ‘ईडी’सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांकडून अनेक नेत्यांवर कारवाई सुरू आहे. याच पार्श्वभूमिवर शिवसेना पक्षाने पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्ला केला आहे. मोदी सरकार उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना घाबरते.
बहुमत असुनही मोदी सरकार आम्हाला घाबरते-
मोदी सरकारला बहुमत असुनही मोदी सरकार शिवेसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना घाबरत असल्याचं शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये म्हटलं गेलं आहे.
विष्णुचे आवडते फूल ‘कमळ’ बदनाम-
सरकारे निवडून आणण्यापेक्षा विरोधकांची सरकारे पाडणे, पक्ष फोडणे, असे जे काही सुरु आहे. त्यामुळे विष्णुचे आवडते फूल असलेले ‘कमळ’ बदनाम झाले आहे, असं म्हणत शिवसेनेने मोदी सरकारला चांगलंच फटकारलं असल्याचंं दिसून येतं आहे. तसेच ऑपरेशन लोटस म्हणजे ‘कमळ’ हा अलकायदाप्रमाणे दहशतीचा शब्द बनला असल्याचंही त्यामध्ये म्हटलं आहे.
शिवसेना पक्षाच्या सामनामधुन सरकारवर हल्ला-
तसेच, या सरकारला भय वाटते कारण हे बहुमत निखळ नाही. ते चोरलेले आहे. धाडसत्र आणि सूडाची छापेमारी ही त्यांचे शस्त्रे आहेत. त्याच शस्त्रांनी त्यांचे ‘ऑपरेशन कमळ’ होते, पण कमळाच्या लाभार्थ्यांवर सरकारी छाप्यांचे वार होत नसल्याचंही शिवसेनेने म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “एकेकाळी इंदिराजींचा होता वट, पण आता टोमणे सेनेसोबत काँग्रेसची झाली फरफट”
- Assembly Session 2022 | “आम्ही गद्दारीचा मुखवटा फाडणार” आदित्य ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल
- महाराष्ट्रात पुन्हा एकदा विदर्भ सिंचन घोटाळा चर्चेत, अजित पवार अडचणीत येणार ?
- Eknath Shinde | आम्ही गद्दारी केली असती तर रस्त्याच्या दुतर्फा हजारो लोक थांबले असते का?
- Eknath Shinde । रांग महत्त्वाची नाही, काम महत्त्वाचं, दिल्लीमधील ‘त्या’ फोटोतल्या टीकांवर मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
