🕒 1 min read
मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात आक्रमक झाल्याचे बघायला मिळत आहे. आज सभागृहात उत्तर देत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मी त्यांच्यासोबत काम केले आहे, त्यांच्या चिठ्या, चपाट्या मला माहिती आहेत’, असे वक्तव्य केले. त्यावर तुम्ही आम्हाला इशारा देताय का, असा प्रश्न अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
पावसाळी अधिवेशनातील पहिले तीन दिवस वादळी ठरले आहेत. आज चौथा दिवस आहे. मी तुमच्यासोबत काम केलंय. मी जे ऐकतोय, पाहतोय. एखाद्याची मर्यादा असते. माझ्याकडे सगळ्यांचा चिठ्ठा आहे. असं इशारा मुख्यमंत्रीनी अजित पवारांना दिला. राजकारणात काम करताना श्रद्धा सबुरी हा महत्त्वाचा गुण असतो. विरोधी पक्षाचे आरोप सहन करण्यापलीकडचे आहेत. सहन करण्याला मर्यादा असतात. विरोधकांच्या चिठ्ठ्या आहेत असं सांगत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात इशारा देण्याचं काम केलंय, असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना केला.
महत्वाच्या बातम्या :
- Assembly Session 2022 | विधानसभेत एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची जुगलबंदी
- Assembly Session 2022 | विधानसभेत मंत्रिच नाहीत! विरोधक भडकले, मुख्यमंत्री म्हणाले “मी अख्खा”
- Eknath Shinde | ‘मोलाचा जीव वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका’, मुख्यमंत्री शिंदेंचं शेतकऱ्यांना भावनिक पत्र
- Supreme Court | शिंदे गटाच्या दोन्ही मागण्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या – सुभाष देसाई
- Uddhav Thackeray। मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच विधानभवनात हजर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
