मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा मुंडे या नुकत्याच तुरुंगातून बाहेर आल्या आहेत. त्यांच्यावर पुण्यातील एका महिलेने गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे त्या काही दिवस तुरुंगात होत्या. तुरुंगातून बाहेर येताच त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यांनी त्यांच्या फेसबुकवर लाईव्ह येत धनंजय मुंडेंवर अनेक आरोप केले आहेत.
“मला खोट्या केसमध्ये अडकवून तुरुंगात टाकण्यात आलं. ४१ दिवसांनी मी येरवडा कारागृहातून बाहेर आले आहे. जेव्हा मी जेलमध्ये गेले तेव्हाच महाविकास आघाडीची सत्ता गेली. ज्यांना सत्तेची मस्ती होती त्यांची मस्ती आता उतरली. माझ्यावर जश्या खोट्या केस केल्या तशाच केस मी त्यांच्यावरही केल्या असत्या. पण मी तसं नाही केलं. कारण लोकांनी मी देवाला मानते. मला कर्मावर विश्वास आहे. त्यामुळे मी देवाला प्रार्थना केली होती कि, माझ्या तपस्येमुळे मागच्या सरकारची सत्ता आली होती. त्यामुळे मी तुरुंगातून बाहेर यायच्या आत जाऊदे आणि तसंच झालं. ज्यांनी खोटी केस केली त्यांना शिक्षा मिळाली. निर्लज्ज लोकांना त्यांच्या पापांची फळं मिळतातच.”, असा अप्रत्यक्ष निशाणा त्यांनी धनंजय मुंडेंवर साधला.
तसेच पुढे करुणा मुंडे असंही म्हणाल्या कि, “मला राजकारण करायचे नाही. मी राजकारणासाठी आले नाही, मला समाजकारण करायचे आहे. महाराष्ट्रात घाणेरडं राजकारण सुरु आहे. घरातल्या घरातही स्वतःच्याच बायको, मुलांविरोधात राजकारण करत आहेत. पण मला तसं करायचं नाही.” पुढे बोलताना त्यांनी राजस्थानमधील शिक्षकाने विद्यार्थ्याला केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेचाही उल्लेख केला.
मुंडे का होत्या तुरुंगात?
करुणा मुंडे यांच्यावर पुण्यातील एका महिलेने गुन्हा दाखल केला होता. या महिलेने सांगितले कि, महिलेचा पती आणि करुणा मुंडे यांनी त्यांना शस्त्राचा धाक दाखवून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच त्यांचे अपहरण करून पतीसोबत घटस्फोट घेऊन जीवे मारण्याची धमकीही दिली होती. तर या महिलेच्या पटीने त्यांचा खूप छळ केला होता. मला करुणासोबत लग्न करायचे आहे. त्यामुळे तू मला घटस्फोट दे, असा आग्रह तिच्या पतीचा होता. असं या महिलेने फिर्यादीत म्हंटले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Devendra Fadanvis | मानधन वेळेत मिळण्यासाठी यंत्रणा विकसित करणार – देवेंद्र फडणवीस
- Nitesh Rane। “एकनाथ शिंदेंच्या खात्याचे निर्णय वरुण सरदेसाई घ्यायचे”; नितेश राणे यांचा दावा
- Monsoon session | “ईडीच्या माध्यमातून का असेना पण नवीन सरकार आलंय, आता तरी…”; शशिकांत शिंदेची मागणी
- Uddhav Thackeray | एकनाथ शिंदेंना त्यांच्याच बालेकिल्ल्यात घेरण्याची तयारी, उद्धव ठाकरेंची ठाण्यातून मेगा रॅली
- Assembly Session 2022 | एकनाथ शिंदे नाव शिवसेनेचे घेतात अन् कार्यक्रम भाजपचा राबवतात – भास्कर जाधव
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

