Share

Vinayak Raut | “बाळासाहेबांचा आणि दिघेंचा फोटो कोपऱ्यात अन् मोदी-शहांचा…”; विनायक राऊतांचा घणाघात

Published On: 

🕒 1 min read

सोलापूर : परवा झालेल्या दहीहंडीच्या उत्सवात गोविंदांच्या उत्साहाबरोबरच सर्वाचं लक्ष वेधण्याचा काम केलं ते म्हणजे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्यातील पोस्टर वॉरने. मुंबई आणि ठाण्यातील नेते मंडळींनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवात त्यांनी लावलेले बॅनर्स आणि त्यावरून एकमेकांना दिलेले टोमणे आणि टोले हे विशेष आकर्षण ठरले. मात्र महत्वाची बाब अशी कि शिंदे गटाच्या नेत्यांच्या बॅनर्सवरून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो गायब होऊन त्या जागी भाजप पक्षश्रेष्ठींचे फोटो लागले होते. त्यावरूनच आज शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटावर हल्लाबोल केला.

“ठाण्यात काल दहीहंडीच्या निमित्ताने अनेकांनी पोस्टर्स लावले होते. पण वर्षानुवर्षे आनंद दिघे यांच्या संस्कारात वाढलेले आणि सतत बाळासाहेब आणि दिघे साहेबांच नाव घेणाऱ्यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचा फोटो कोपऱ्यात लावला होता आणि त्याच्या अनेक पटींने मोठे फोटो नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे फोटो लावले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आदर कसा करावा याचं भान शिवसैनिकांना आहे. परंतु ज्यांनी शिवसेनेशीच गद्दारी केली ते आजही बाळासाहेबांचा फोटो वापरत आहेत. हा केवळ जनतेची सहानुभूती मिळवण्याचा हा प्रयत्न आहे.”, अशी टीकाही विनायक राऊत यांनी यावेळी केली.

तसेच पुढे ते असंही म्हणाले कि, “कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबूल केले कि, देशातील मोदींची लाट आता संपत चालली आहे. त्यामुळे त्यांच्या नावाने मतं मागण्याचे दिवसही गेले आहेत. त्यामुळेच यांना आता बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेण्याशिवाय पर्यायच नाही. असंही फडणवीसांनी कबूल केले.” यावेळी बोलताना त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही सडकून टीका केली.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!