🕒 1 min read
मुंबई : गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महापालिकेत एका कुटुंबाची सत्ता आहे. आता मुंबई महापालिकेत सर्वसामान्यांचे सरकार हवे आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई जिंकायची आहे, असे आशिष शेलार म्हणाले. शेलार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आजच्या महाभारतातील कृष्ण संबोधले. ते म्हणाले, देवेंद्र फडणवीस कृष्णाच्या भूमिकेत आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कर्णाच्या भूमिकेत आहेत. ते म्हणाले, यापुढे सर्व सण उत्साहात साजरे होतील. यावर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी जोरदार पलटवार केला आहे.
तो आंधळा धृतराष्ट्र आता काहीही बोलत नाही-
सुषमा अंधारे म्हणाल्या, “या लोकांचा अभ्या कच्चा आहे. कारण पात्रांची निवड चुकली आहे. कृष्णाचं पात्र फडणवीस रंगवत आहेत, असं जर त्यांना वाटत असेल तर फडणवीस हे धृतराष्ट्राची भूमिका निभावत आहेत. एक असे धृतराष्ट्र ज्यांनी आधी ढिगाने आरोप केले होते. आता उघड्या डोळ्यांनी सर्व कळत असूनही ‘बंद डोळे, बंद ओठ, बंद त्या पापण्या, आज प्रिये मी खरी प्रित पाहीली तुझ्यात’, असे म्हणणारा हा धृतराष्ट्र आहे. ईडी आरोप केलेले लोक जेव्हा तिकडे गेले तो आंधळा धृतराष्ट्र आता काहीही बोलत नाही.”
आशिष शेलार, किरीट सोमय्या हे सर्व शकुनी आहेत-
आशिष शेलार, किरीट सोमय्या हे सर्व शकुनी आहेत. जे शकुनी खर काय ते सांगत नाहीत. जे शकुनी भावना गवळी आणि प्रताप सरनाईक यांना माफिया म्हणून बोलत होते. त्या भावना गवळी जेव्हा त्यांच्या महाशक्तिला (नरेंद्र मोदी) राखी बांधायला जातात. या राखी बांधल्याने आपल्या राज्यात कदाचीत फार मोठा भूकंप येऊ शकतो. लोक विसरले नाहीत. हे माहित असताना देखील धृतराष्ट्र काहीच करु शकत नाही. कारण धृतराष्ट्र हतबल झाला आहे. धृतराष्ट्र सत्तेसाठी एवढा हपापलेला आहे की त्यांना न्याय काय?, सत्य काय?, या सगळ्या गोष्टींचा विसर पडला आहे. त्यामुळे फडणवीस मला कृष्ण नाही तर धृतराष्ट्र वाटतात.
आशिष शेलार यांची तुफान फटकेबाजी-
मुंबईमध्ये भाजप कार्यकर्ता मेळाव्यात मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीचा नारळ भाजपने फोडला. “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष होते तेव्हापासून त्यांचे काम मी बघत आहे. त्यांच्या नेतृत्वात काम देखील केले आहे. महाराष्ट्राचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, उपमुख्यमंत्री, आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दिलेला पट हे पाहून मला अमिताभ बच्चन यांचा डायलॉग आठवतो. ‘जहाँ हम खडे होते है लाईन वहासे शुरु होती है’, त्यामुळे जहाँ फडणवीस खडे, लाईन वहीसे शुरु होगी,” असे आशिष शेलार म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Devendra Fadnavis | कितने आदमी थे?, 65 मे से 50 निकल गये- देवेंद्र फडणवीस
- Shweta Mahale । भाजप आमदार श्वेता महालेंच्या दहीहंडी कार्यक्रमात तुफान हाणामारी
- Sonam Kapoor | सोनम कपूर झाली ‘आई’ ! म्हणाली, “आमचं आयुष्य बदललंय”
- Devendra Fadanvis | “मुंबई महाराष्ट्राशिवाय कोणाच्या बापाची नाही, बाळासाहेबांचे स्वप्न…” ; फडणवीसांचे जोरदार भाषण
- Satyajeet tambe | गोविंदाना नोकरीत आरक्षणाबाबत सरकारने पुनर्विचार करावा – सत्यजित तांबे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
