🕒 1 min read
बुलढाणा : राज्यभरात दहीहंडी कार्यक्रम उत्साहात साजरा केला गेला. चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले आणि भाजपा युवा मोर्चाने आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार घडला आहे.
https://www.facebook.com/MahaDeshaa/videos/1041624379884048
या हाणामारीत एक गोविंदा जखमी झाला आहे. श्वेता महालेंनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात दहीहंडी फोडण्यासाठी अनेक गोविंदा जमले होते. डॉल्बीच्या धुंदीत नाचताना जमावाने अचानक एका गोविंदाला बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली. ही मारहाणीचे नेमके कारण अद्याप कळाले नाही. दहीहंडीच्या कार्यक्रमात अचानक वादाला सुरुवात झाली. यानंतर जमावाने या युवकाला तीन मिनिटं बेदम मारहाण केली. याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यामुळे पोलिसांनी एवढ्या गर्दीमध्ये जाऊन तरुणाला लवकर वाचवणं शक्य झालं नाही. शेवटी घाई घाईत दहीहंडी फोडण्यात आली आणि हा कार्यक्रम संपविण्यात आला.
महत्वाच्या बातम्या :
- Sonam Kapoor | सोनम कपूर झाली ‘आई’ ! म्हणाली, “आमचं आयुष्य बदललंय”
- Devendra Fadanvis | “मुंबई महाराष्ट्राशिवाय कोणाच्या बापाची नाही, बाळासाहेबांचे स्वप्न…” ; फडणवीसांचे जोरदार भाषण
- Satyajeet tambe | गोविंदाना नोकरीत आरक्षणाबाबत सरकारने पुनर्विचार करावा – सत्यजित तांबे
- Kailash Vijayvargiya | “परदेशातल्या स्त्रिया कधीही बॉयफ्रेंड बदलतात”; त्या वक्तव्यावर कैलाश विजयवर्गीय यांचे स्पष्टिकरण
- Mumbai Attack | मुंबई हल्याच्या धमकीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
