🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. फडणवीस यांनी यावेळी बीएमसी निवडणूक जिंकल्याचा दावा करत विरोधकांवर हल्लाबोल केला. शिवसेनेवर हल्लाबोल करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आता मुख्यमंत्री घरी बसणार नाहीत, लोकांनाही बसू देणार नाहीत. यावेळी भाजप आणि शिवसेना बीएमसीवर भगवा फडकवतील पण खऱ्या शिवसेनेसोबत, ज्याचे नेतृत्व आहे एकनाथ शिंदें करत आहेत. आम्ही मागच्या वेळीही महापौर करू शकलो असतो. पण मित्र पक्षासाठी मागचे पाऊल घेतले.
उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, “आम्हाला मुंबई विकास लीग सुरू करायची आहे. येत्या काही महिन्यांत आम्हाला खूप मेहनत करायची आहे. (मुंबई महापालिका निवडणुकीबाबत) मुंबई महापालिका सध्या भ्रष्टाचाराने भरलेली आहे. महापालिका मोकळे व्हावे लागेल.मुंबई महानगरपालिकेत सर्वसामान्यांसाठी कोणतेच काम झाले नाही. निवडणूक जवळ आली की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.”
बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न भाजप पूर्ण करेल-
ते म्हणाले, “मुंबई महाराष्ट्राशिवाय कोणाच्या बापाची नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम भाजप करेल.” माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता फडणवीस म्हणाले, “तुम्ही दिल्लीपुढे झुका, सोनिया गांधींपुढे नतमस्तक व्हा, मात्र महाराष्ट्राच्या विकासासाठी आम्ही दिल्लीला जाऊ.”
आशिष शेलार यांची तुफान फटकेबाजी-
आशिष शेलार यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीचा नारळ भाजपने फोडला. “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष होते तेव्हापासून त्यांचे काम मी बघत आहे. त्यांच्या नेतृत्वात काम देखील केले आहे. महाराष्ट्राचे अध्यक्ष, मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेता, उपमुख्यमंत्री, आणि महाराष्ट्राच्या राजकारणात दिलेला पट हे पाहून मला अमिताभ बच्चन यांचा डायलॉग आठवतो. ‘जहाँ हम खडे होते है लाईन वहासे शुरु होती है’, त्यामुळे जहाँ फडणवीस खडे, लाईन वहीसे शुरु होगी,” असे आशिष शेलार म्हणाले.
मी तिसऱ्यांदा मुंबईचा अध्यक्ष झालो-
आशिष शेलार म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणाचा पट तुम्ही (देवेंद्र फडणवीस) बदलला. कुणाला कल्पणा नव्हती, अशा महाराष्टाचे चित्र आज सर्वजण पाहत आहेत. केंद्राने मला मुंबईचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली. मी तिसऱ्यांदा मुंबईचा अध्यक्ष झालो. मला मुंबईचा अध्यक्ष पुन्हा का केलय, हा विचार मी करत होतो. पण पक्षाने एका विचाराला, एका समस्येला, जागृतीला अध्यक्ष बनवलं.”
शिवसेनेने मुंबईला काय दिले?-
देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक करत आशिष शेलार एवढ्यावरच थांबले नाहीत, ते म्हणाले, “मुंबईला मेट्रोही देवेंद्र फडणवीस यांनीच दिली आहे. केंद्र सरकारने मुंबईला बुलेट ट्रेनची भेट दिली आणि शिवसेनेने मुंबईला काय दिले? भ्रष्टाचार भ्रष्टाचार आणि फक्त भ्रष्टाचार.”
महत्वाच्या बातम्या :
- Mumbai Attack|मुंबई हल्याच्या धमकीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रीया, म्हणाले…
- Devendra Fadnavis । “मागच्यावेळीच भाजपचा मुंबईत महापौर होणार होता, पण…”; फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट
- Ashish Shelar | “जहाँ फडणवीस खडे, लाईन वहीसे शुरु” ; भाजपच्या मेळाव्यात आशिष शेलारांची डायलॉगबाजी
- Ashish Shelar| “शिवसेनेनं आतापर्यंत महापालिकेत फक्त भ्रष्टाचार…”, आशिष शेलार यांचा शिवसेनेवर टीकेचा बाण
- Rohit Pawar | महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठी गोविंदा आरक्षणाचा निर्णय; रोहित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
