🕒 1 min read
मुंबई : भारतीय राज्य घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा घोटू नका, असा इशारा देत कुणी काय खावे, काय घालावे आणि आता काय बोलावे, हे तुम्ही ठरवणार का, असा प्रश्न राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारला आहे. मुनगंटीवार यांनी शासकीय कार्यालयात बोलताना हॅलो ऐवजी वंदे मातरम बोलावे असे म्हटले असून तसा आदेशच त्यांनी काढला आहे. जर आम्ही तसे म्हटले नाहीतर तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकणार का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
नमन करण्यासाठी काही लोकांनी विरोध दर्शवला असेल तर लोकशाही आहे. त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठी 26 जानेवारी पर्यंत आम्ही अभियान करणार आहोत. आपल्या मराठी गीतांमध्ये अतिशय सुंदर वर्णन ‘वंदे मातरम’ च केलं आहे. जे विरोध करत असतील त्यांच्याशी संवाद करू. महाराष्ट्रामध्ये कोणत्या पक्षाचे काय मत आहे हे माझ्या दृष्टीने गौण आहे. शिवसेनेकडे जी खाते होती ती शिवसेनेकडेच आहेत. आव्हाडांच्या वक्तव्यावर सुधीर मुनगंटीवार यांच्या पलटवार.
महत्वाच्या बातम्या :
- Supriya Sule | “घरात बायको पण एवढी फुगत नसेल तेवढे हे मंत्री फुगतात” ; सुप्रिया सुळेंचा शिंदे सरकारला टोला
- Rakesh Jhunjhunwala | राकेश झुनझुनवाला यांच्या मृत्यूनंतर 46 हजार कोटींचे साम्राज्य कोण सांभाळणार?
- “हात तोडता येत नसेल तर पाय तोडा, जमानत मी घेईल”, शिदें गटाच्या आमदाराचे वादग्रस्त विधान
- Jitendra Awhad। “बोलण्याची सुरुवात कशाने करायची हे पण तुम्हीच शिकवणार का?” जितेंद्र आव्हाड यांचा मुनगंटीवारांना सवाल
- Shiv Sena | तुम्ही ‘प्रति-शिवसेना’ भवन उभारलं तरी श्रद्धा आणि निष्ठेचे स्थान एकच असते; शिवसेनेचा सामानातून हल्लाबोल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
