Share

Jitendra Awhad | शाईफेक प्रकरणावरून जितेंद्र आव्हाडांची राज्य सरकारवर टीका; म्हणाले, “यांनी महाराष्ट्रात आग लावण्याचं…”

Published On: 

🕒 1 min read

Jitendra Awhad | मुंबई : महात्मा जोतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील आणि डॉ. बाबासाहेबब आंबेडकर यांनी अनुदान न मागता भीक मागून शाळा सुरु केल्या, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी गेल्या दोन- तीन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड येथे केलं होतं. त्यानंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आपल्या वक्तव्यावरून दिलगीरी देखील व्यक्त केली. परंतु, काल पिंपरी-चिंचवड येथे त्यांच्यावर शाई फेकण्यात आली.

शाईफेक करणाऱ्या ( Throwing ink) तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी  (Police Custody) सुनावली आहे. शाईफेक करणाऱ्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि सरकारी कामात अडथळा निर्माण करणे असे गुन्हे दाखल झाले आहेत. दरम्यान, यावर  राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी प्रतिक्रिया देत राज्य सरकावर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सरकार म्हणून आपण जेंव्हा शाईफेक करणाऱ्यांवर कलम 307 हा गुन्हा लावतो ते चुकीचं असल्याचे म्हटले आहे.  चंद्रकांत पाटलांवर झालेली शाईफेक चुकीचीच होती, पण शाईफेक करणाऱ्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून शिंदे-फडणवीस सरकारने महाराष्ट्रात आग लावण्याचं काम केलं, असं मत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी व्यक्त केलं.

जितेंद्र आव्हाड यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका प्रकरणात भाजप कार्यकर्ता महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. याचा संदर्भ देत ते म्हणाले, न केलेल्या गुन्ह्यासाठी एखादं कलम लावणं ह्यातून आपण आंदोलनाच्या समर्थकांना पूर्णपणे जागे करीत आहात. माझ्यावर लावलेला कलम 354 आणि शाईफेक करणाऱ्यावर लावलेला 307 हे दोन्ही एकच आहेत.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!