🕒 1 min read
मुंबई : बिग बुल राकेश झुनझुनवाला यांनी खूप मोठे साम्राज्य मागे सोडले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी रेखा झुनझुनवाला, मुलगी निष्ठा झुनझुनवाला, मुलगा आर्यमन आणि आर्यवीर झुनझुनवाला असा परिवार आहे. झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती सुमारे 46 हजार कोटी आहे. आता त्यांची पत्नी त्यांच्या मुलांसह साम्राज्याचा ताबा घेणार आहे.
राकेश झुनझुनवाला यांचे रविवारी वयाच्या 62 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या भावाचे दुबईहून आगमन झाल्यानंतर काल रात्री उशिरा मुंबईतील बाणगंगा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. झुनझुनवाला यांच्या जाण्याने त्यांच्या विमान कंपनी आणि इतर व्यवसायासमोर आता मोठी आव्हाने येऊ शकतात.
अकासा एअरमधील एकूण भागीदारी 40 टक्क्यांहून अधिक-
गुंतवणुकदार असण्याव्यतिरिक्त झुनझुनवाला हे Aptech Ltd आणि Hungama Digital Media Entertainment Pvt Ltd चे अध्यक्ष होते. बिलकेअर लिमिटेड, प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड, प्रोव्होग इंडिया लिमिटेड, कॉनकॉर्ड बायोटेक लिमिटेड, इनोव्हासिंथ टेक्नॉलॉजीज (आय) लिमिटेड, प्राइम फोकस लिमिटेड, जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेस, मिड डे मल्टीमीडिया लिमिटेड, नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड, व्हाईसरॉय सिक्युरिटी लिमिटेड आणि डायरेक्टर टॉप हॉटेल लिमिटेडचे बोर्ड ऑफ डायरेक्टर होते. सोबतच राकेश आणि त्यांच्या पत्नीची अकासा एअरमधील एकूण भागीदारी ४० टक्क्यांहून अधिक आहे. ते स्टार हेल्थ अलाईड इन्शुरन्सचे प्रवर्तक देखील आहेत. जून तिमाहीत, त्यात त्यांची हिस्सेदारी सुमारे 17.46% होती.
राकेश झुनझुनवाला हे भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जातात-
राकेश झुनझुनवाला हे भारताचे वॉरेन बफे म्हणून ओळखले जातात. राकेश हे देशातील सर्वात यशस्वी गुंतवणूकदारांपैकी एक आहेत. त्यांनी 1985 मध्ये 5000 रुपयांची गुंतवणूक सुरू केली. त्यावेळी बीएसईचा निर्देशांक 150 वर होता. पत्नी रेखा यांच्या सांगण्यावरून त्यांनी 2003 मध्ये स्वत:ची स्टॉक ट्रेडिंग फर्म रेअर एंटरप्रायजेसची स्थापना केली. त्याच्या नावावर त्यांनी ते आपल्या आणि पत्नी रेखाच्या नावाच्या पहिल्या दोन अक्षरांवर लावले आहे. त्यांवी राकेशवरून ‘रा’ हे नाव ठेवले होते. तर दुसरा शब्द पत्नीच्या नावाचा ‘रे’ होता.
महत्वाच्या बातम्या :
- “हात तोडता येत नसेल तर पाय तोडा, जमानत मी घेईल”, शिदें गटाच्या आमदाराचे वादग्रस्त विधान
- Jitendra Awhad। “बोलण्याची सुरुवात कशाने करायची हे पण तुम्हीच शिकवणार का?” जितेंद्र आव्हाड यांचा मुनगंटीवारांना सवाल
- Shiv Sena | तुम्ही ‘प्रति-शिवसेना’ भवन उभारलं तरी श्रद्धा आणि निष्ठेचे स्थान एकच असते; शिवसेनेचा सामानातून हल्लाबोल
- Shiv Sena । “संजय राठोडांवर ट्रकभर फुले उधळण्यात पण त्या फुलांच्या प्रत्येक पाकळीतून पुण्याच्या ‘निर्भया’ची किंकाळीच ऐकू येत असेल”
- Shiv Sena : एक शिंदे गट बारा भानगडींचा फुकट मॅटिनी शो बघायला काय हरकत आहे?; शिवसेनेचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
